वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून प्रतीक असलेला दसरा हा सण पूर्ण भारतभर उत्साहाने साजरा केला जातो.

दसऱ्याच्या दिवशी रावणाचा मोठा पुतळा उभा करून त्याला जाळले जाते, त्याला आग लावली जाते म्हणजेच थोडक्यात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जातो.

पण भारतात काही ठिकाणी अशी आहेत ज्या ठिकाणी दसऱ्याला रावणाला न जाळता शोक मनवला जातो.

दसऱ्याच्या दिवशी भारतात या ठिकाणी शोक साजरा केला जातो

मंदसौर, मध्यप्रदेश मधील मंदसौर या गावाला रावणाची सासुरवाडी मानली जाते. येथील लोक रावणाला त्यांचा जावई मानतात व त्याचा पुतळा जाळत नाहीत.

बिसरख, नोएडा जवळील बिसरख या गावात रावणाचा जन्म झाला होता अशी कल्पना आहे, त्यामुळे येथील लोकसुद्धा रावणाच्या पुतळ्याचे दहन करत नाहीत.

कांगरा, हिमाचल प्रदेश मधील कांगरा या गावात देखील रावणाचा सन्मान केला जातो कारण तिथेच रावणाने भव्य तपश्चर्या करून भगवान शिव कडून आशीर्वाद प्राप्त केला होता

मंडोर, राजस्थान मधील मंडोर या गावात सुद्धा रावणाचा पुतळा जाळला जात नाही. कारण इथेच रावणाचे व मंदोदरीचे लग्न झाले होते.

आजच्या व्हायरल मराठी बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा