देसी जुगाड व्हायरल व्हिडिओ : उंदीर जरी हा शेतकऱ्यांचा मित्र असला तरी तो त्यांच्या घरात त्यांचा मित्र नसतो तो शेतातच. तसं म्हणायला गेलं तर उंदीर कोणाच्याच घरी कोणाचा मित्र होऊ शकत नाही. कारण दिसेल ती वस्तू कुरतडणे, फाडणे, तोडणे नको तिथे घाण करणे, अन्नाची नासाडी करणे, कपडे कुरतडणे अथवा फाडणे ही उंदराची रोजची कामे.
आपण सर्वजणच उंदराच्या ह्या वागण्याला कंटाळलेलो असतो त्यामुळे त्याला घरातून हाकलून देण्याचे नवनवीन उपाय शोधत असतो. किंवा मग दमून आपण उंदीर मारायचे औषध आणून त्यांना मारायचा प्रयत्न करतो पण ते मेले तरी पण ते घरातुन काढून बाहेर टाकून देणे हे सुद्धा आपल्याला जीवावर येते त्यामुळे त्यांना न मारता घरातून कसे हाकलून लावायचे याचे उपाय आपण बघत असतो.
नुकताच इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बिना मेहनत आणि बिना खर्चाचे कसे घरगुती जुगाडाने उंदीर पकडता येतात हे दाखवण्यात आल आहे. यामध्ये दोन मोठ्या बाटल्या घेऊन त्याच्यावर पाईप बसवण्यात आली आहे. तसेच बाटलीच्या तळ्यात धान्य ठेवल्यामुळे उंदीर ते धान्य खायला येतात आणि पाईप मधून सरळ आत बाटलीत पडतात. हे एकदम मजेशीर वाटत असून तुम्ही एकदा व्हिडिओ पहाच.
हाच तो उंदीर पकडण्याचा देशी जुगाड व्हायरल व्हिडिओ
tiptopyatra या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओ 2 लाख पेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. लोक यावर लाईक आणी वेग वेगळ्या कमेंट सुद्धा करत आहेत आणि हसण्याचे इमोजी सुद्धा पोस्ट करत आहेत.
👉 Viral Video : ‘आमच्या पप्पांनी आयफोन आणला…’; चिमुकलीचा हा व्हायरल व्हिडीओ पाहिला का?