रेल्वे अपघात बातमी : मान्य आहे कि रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना घाई करावी लागते पण इककिही घाई चांगली नाही जी जीवावर बेतेल.
रेल्वे स्टेशन वर सर्व आपापल्या घाई गडबडीत असते कुणाची रेल्वे येणार आहे म्हणून ते वाट पाहत असतात तर कुणी नुकतेच रेल्वेतून उतरून घरी जाण्याच्या गडबडीत असतो. पण हीच घाई कधी कधी जीवावर बेतू शकते आणि असं अनेकदा घडलंही आहे.
रेल्वे मध्ये चढताना अनेकदा तोल जाऊन जाऊन जीव गेल्याच्या घटना आपण नेहमी ऐकत असतो तसें व्हिडिओही पाहायला मिळत असतात पण आपण त्या व्हिडिओ मधून काय घेतो.
सध्या असाच एक train accident चा viral video मध्य रेल्वेने त्यांच्या official twitter handle वर शेअर केला आहे. व्हिडिओत पाहायला मिळतंय कि..
रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वे डब्यात चढण्याच्या नादात एका व्यक्तीने जीव गमावला असता. त्या व्यकीचा डब्यात चढत असताना तोल जाऊन पाय घसरल्याने तो व्यक्ती रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकून खाली जात होता. पण सुदैवाने त्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास ही बाब आली आणि त्याने अत्यंत घाईने पळत जात त्याला बाहेर ओढले. या घडलेल्या रेल्वे अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या Train Accident Video वर खूप साऱ्या लाईक्स आणि कमेंट येत आहेत. एका यूजरन लिहलंय कि लोक कायम मूर्ख काम करतात.
हा रेल्वे अपघाताच्या बातमीचा व्हिडिओ सेंट्रल रेल्वेने त्यांच्या @Central _Railway twitter अकाउंट वर शेअर केला आहे.