“धडकन” चित्रपटातील कलाकार शिल्पा शेट्टीने टोमॅटोच्या किमती संबंधित एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या सोशल मीडियावार व्हायरल होत आहे.
टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा फटका सेलिब्रिटींसह सर्वांनाच बसत आहे. काही काळापूर्वी, सुनील शेट्टीने टोमॅटोच्या वाढत्या किमतींबद्दल आपली प्रतिक्रिया शेअर केली होती आणि तो ट्रोल झाला होता. त्यानंतर आता ‘धडकन’ चित्रपटात सुनील शेट्टीसोबत काम करणाऱ्या शिल्पा शेट्टीने आता टोमॅटोचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे.
या व्हिडीओसोबत शिल्पा शेट्टीने ‘टोमॅटोचे भाव माझ्या हृदयाचे ठोके वाढवत आहेत’ अशी विनोदी टिप्पणी केली आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या दाराच्या प्रश्वभूमीवर तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून हसायस्पद प्रतिसाद मिळत आहेत. अनेकांना हा व्हिडिओ मनोरंजक वाटत असतानाच काही नेटकऱ्यांनी टोमॅटोच्या किमतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
एका यूजरणेतर अशी कमेंट केलीय कि , “टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे, मध्यमवर्गीय लोकांवर याचा लक्षणीय परिणाम होतो. तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांनाही फरक पडतो हे आज कळाले.” उजर्सकडून अशा अनेक मनोरंजक प्रतिक्रिया आहेत.
शिल्पा शेट्टीच्या या मनोरंजक व्हिडिओमुळे हशा पिकला असला तरी हा व्हिडिओ टोमॅटोच्या दरवाढीमुळे लोकांना भेडसावत असलेल्या समस्यांचे प्रतिबिंब देखील दर्शवते.