जुगाड व्हायरल व्हिडिओ : आपण सर्वजण रोज प्रवास करत असतो मग तो छोटा पल्ल्याचा असो किंवा मोठा पल्ल्याचा. दैनंदिन जीवनात मग तो मोटरसायकल असो वा चारचाकी किंवा मग बस किंवा रेल्वे इत्यादी वाहनांनी आपण प्रवास करत असतो. आपण सर्वांनीच कधी ना कधी बसने प्रवास केला असेल. त्यामुळे आपण सर्वांनी बस पाहिली आहे.
आज आम्ही तुम्हाला एका अशा जुगाड बस बद्दल बोलणार आहोत जिला पाहून तुम्हाला चक्कर आली तर आम्ही जबाबदार नाही.
तुम्ही पण कधी ना कधी कोणत्या कामासाठी काहीतरी जुगाड केला असेलच. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक बस दाखवली आहे. ही बस मागून ही पूर्णपणे बस आहे पण एका इंजिनियर ने डोकं चालवून त्या बसचे पुढील इंजन काढून टाकले व ते ट्रॅक्टरच्या मागच्या साईडला जोडले आहे. म्हणजे पुढुन ट्रॅक्टर चालतो व मागे बस ओढली जाते अशा प्रकारे ट्रॅक्टर आणि बस या दोघांना जुगाड करून एकत्र केले गेलेल आहे. मग तुम्ही याला काय नाव द्याल ट्रॅक्टरबस की बसट्रॅक्टर, का जुगाड बस?
Jugaad Viral Video
हा जुगाड व्हिडिओ instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर memesone_2 या अकाउंटद्वारेद्वारे शेअर करण्यात आला. याला आतापर्यंत जवळपास 60000 पेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून त्यावर लाईक आणि कमेंट्स चा वर्षाव होत आहे. खरंच भारत देशात एवढे जुगाड भेटतील की त्यांना खरंच एक अवॉर्ड दिला पाहिजे.
👉 Viral Video : ‘आमच्या पप्पांनी आयफोन आणला…’; चिमुकलीचा हा व्हायरल व्हिडीओ पाहिला का?.