Jailer Kavalaya Song Dance Video Of Little Girl: नुकताच रिलीझ झालेल्या साऊथ सिनेमा जेलर (Jailer) प्रचंड हिट होताना दिसत आहे. कमाईची गोष्ट बोलायची झाली तर या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास 500 कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपटात दक्षिणात्य सुपर स्टार रजनीकांत याच्या तुफानी action जबरदस्त डायलॉगबाजी आणी उत्साहपूर्ण डान्स तर आहेच शिवाय त्यात साऊथ सुंदरी तमन्ना भाटिया हिचा सुद्धा एक कावाला (Kaavaalaa song) हा आयटम सॉंग खूपच फेमस होत आहे.
सोशल मीडिया वर तर हे गाणे प्रचंड धुमाकूळ घालत आहे शिवाय या गाण्यावर रील्स बनवण्याचा मोह भल्या भल्या सेलिब्रिटिना आवरत नाहीये. नुकताच ‘दिया और बाती’ मालिकेतील अभिनेत्री दीपिका सिंह तसेच तमन्ना भाटिया हिचा प्रियकर (सूत्रांकडून माहिती) विजय वर्मा तसेच बऱ्याच लोकांनी या गाण्यावर रील्स बनवून आनंद लुटला आहे.
सध्या एका लहान मुलीचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Little Girl Dance Video Viral) होताना दिसत आहे. ही एक लहान चिमुकली मुलगी असून तिचे हावभाव, तिची अदा, तीचा डान्स बघून पब्लिक भारावून गेले आहे.
हा व्हिडिओ @cutiepie_riva या हँडलने शेअर केलेला असून यावर जनतेकडून लाईक्स आणी कंमेंट्स चा वर्षाव होत आहे व तिजे आवर्जून कौतुक होताना दिसत आहे. (Kaavaalaa Viral Video Of Little Girl).