पेट्रोल पंपावर मोबाईल फोन वापरण्यास मनाई असे बोर्ड्स लावलेले असतात पण कोण त्याच पाळणं करत. काही वेळेस पेट्रोल पंपावरील कर्मचारीच पंपाच्या आवारात मोबाइलवर बोलत असताना दिसतात. पण पंपावर लिहिलेली ” पेट्रोल पंपावर मोबाईल फोन वापरण्यास मनाई आहे ” हि सूचना खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
Viral video petrol pump : सध्या सोशल मीडियावर एक petrol pump accident चा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विडिओ मध्ये एक व्यक्ती एका वयस्कर आजोबांना गाडीवर पाठीमागे बसवून पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबली आहे. पेट्रोल भरत असताना त्या व्यक्तीचा मोबाईल वाजतो आणि तो फोनवर बोलण्यासाठी मोबाईल घेतो तोच अचानक मोबाईल पेट घेतो व पंपावर आग लागते. तो व्यक्ती गाडी टाकून पळ काढतो व पाहिमागील आजोबा गाडीवरून खाली पडतात माग तो व्यक्ती मागून आजोबांना हात देऊन ओढून बाजूला घेतो.
पेट्रोल पंपावरील कर्मचारी तातडीने येऊन लागलेली आग विजवण्यास सुरुवात करतात व त्यात त्यांना यश येते व मोठा अनर्थ टाळतो.
पेट्रोल पंपावरील हा आजचा व्हायरल व्हिडिओ @powerofonenews नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर कंमेंट्स करून काही यूजर्स आपला संताप व्यक्त करत आहेत. एकाने लिहलंय “गया”. तर एकजण लिहितो “अंतिम संस्कार होजाता अभि.