Bike Jugaad : भारत देशात रोज नवनवीन काय ना काही मनोरंजक पाहायलाच मिळत असते. भारत देशात इंजिनियर लोकांची काही कमी नाही आणि त्याचबरोबर जुगाडू इंजिनियरची तर बिलकुलच नाही. हे जुगाडू लोक रोज काही ना काही तर जुगाड करून नवनवीन व्हिडिओ फोटोज अपलोड करत असतात. इंटरनेटवर हे सध्या काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यातीलच एक हा जुगाड वाल्या बाईक वाला व्हिडिओ.
जुगाड वाली बाईक (Jugaad Vehicle) : जुगाडशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात कारण आपल्या देशात जुगाड करणाऱ्या आणि प्रयोग करणाऱ्यांची कमी नाही. ते अनेकदा असे आश्चर्यकारक पराक्रम करतात की ते सोशल मीडियावर हेडलाइन बनतात. जुगाडशी संबंधित असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या जुगाड मेंदूचा वापर करून ट्रॅक्टरचा टायर बाइकच्या पुढच्या भागाला लावला आणि तो सुद्धा मोठा म्हणजे ट्रॅक्टरचा मोठा टायर.
दुचाकीला ट्रॅक्टरचे टायर लावले | Gadi jugaad
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने पल्सर बाइकच्या पुढील भागाला ट्रॅक्टरचा टायर बसवला आहे, असे दिसत आहे. आणि पल्सरवर बसून अगदी आरामात बाईक रस्त्यावर चालवत आहे. ट्रॅक्टरचे चाक पल्सरमध्ये कसे बसू शकते, हे दृश्य पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल.
हा व्हिडिओ instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर mrhifixyz या अकाउंट वरून अपलोड करण्यात आला. या विडिओ ला आतापर्यंत 3 लाख पेक्षा जास्त लोकांनी बघितला असून लाईक्स आणी कंमेंट्स चा वर्षाव केला जात आहे.