Aamchya Pappani Iphone Aanla : नुकताच गणेश उत्सव पार पडला असून नवरात्रीचे सुद्धा चार दिवस झाले आहेत पण तुम्हाला माहित आहे का की या गणेशोत्सवा मध्ये काय खास होतं तर या गणेशा मध्ये एक गाणं खूप सुपरहिट झालं त्या गाण्याचं नाव होतं “आमच्या पप्पांनी गणपती आणला” हो हे गाणे इतकं फेमस झालं की इन्स्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडियावर तर याने धुरळा उडवला शिवाय youtube वरही या गाण्याला 20 लाख पेक्षा जास्त व्ह्यू आले. शाळेच्या ड्रेस मध्ये साईराज नावाच्या मुलाने केलेली ही रील सुपरहिट ठरली.
पण सध्या मात्र याच गाण्याचे आणि भरपूर विनोदी मिम्स आले. त्यातील असे एक आता सध्या आणखी व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक लहान मुलगी याच घराची कॉपी करत एक वेगळाच विनोदी गाणं म्हणत आहे. यामध्ये तिचे हावभाव बघण्या लायक असून तिच्या गाण्याचे बोल आहेत की “आमच्या पप्पा ने आयफोन आणला”
Ishukale77 या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा विडिओ शेअर झाला असून या विडिओ ला सुद्धा 3 लाख पेक्षा जास्त लोकांनी बघितलं आहे. हा विडिओ सुद्धा लोकांना खूप आवडला असून यावर सुद्धा लाईक्स आणी कंमेंट्स चा वर्षाव होत आहे शिवाय या चिमुकलीच सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे.