Palak Paratha Recipe in Marathi: आपल्या मुलांनी सर्व प्रकारच्या भाज्या खाव्यात असे प्रत्येक आईला वाटत असते. पण मुलं पालेभाजी ची नाव ऐकूनच नाक मुरडतात, विशेषतः पालकची भाजी मुलांना अजिबात आवडत नाही. म्हणून जर आपण याच पालकाचे पराठे बनवले तर मुलं आवडीने खातील कारण ते खूप टेस्टी होतात व मुलांना कळतच नाही की यामध्ये पालक आहे. चला तर मग जाणून घेऊयात पौष्टिक व रुचकर अशा पालक पराठे ची रेसिपी.
पालक पराठ्यांसाठी लागणारे साहित्य
एक मोठी वाटी पालक ची स्वच्छ धुतलेली पान
तीन वाटी गव्हाचे पीठ
एक छोटा चमचा बेसन पीठ
2-3 हिरव्या मिरच्या व अर्धा इंच आल्याचं वाटण
अर्धा छोटा चमचा ओवा
अर्धा चमचा जिरे
अर्धा चमचा हळद
दोन चमचे तेल
चविप्रमाणे मीठ
पालक पराठे बनवण्याची कृती
पालक पराठा हा दोन प्रकारे करता येतो एक म्हणजे पालकाचे सारण करून ते भरून पराठे लाटतात आणि दुसरे म्हणजे पिठामध्ये सर्व साहित्य मिसळून त्याचे पराठे बनवतात. आपण आज दुसऱ्या पद्धतीने पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
प्रथम स्वच्छ धुतलेली पालकाची पाने बारीक चिरून घ्यावीत, त्यामध्ये मीठ, गव्हाचे पीठ, बेसन व दोन चमचे तेल घालावे. बाकीचे सर्व जिन्नस ही पिठामध्ये मिक्स करून घ्यावेत.
आपल्याला पीठ थोडस घट्टसरच मळायचे आहे, त्यामुळे पालकाला मिठामुळ सुटलेल्या पाण्यातच पीठ मळावे व गरज पडल्यास वरून थोडं थोडं पाणी टाकत पिठाचा गोल गोळा बनवून घ्यावा. पालक पराठे लगेच लाटण्यासाठी घ्यावेत कारण जर खूप वेळ कणिक ठेवली तर सैल होईल व पराठे लाटताना चिकटतील त्यामुळ कणिक मळून खूप वेळ ठेवू नये. आता छोटे किंवा मध्यम आकाराचे पराठे लाटून घ्यावेत मोठ्या आचेवर छान खमंग शेकून घ्यावेत. हे पराठे गोड दह्याबरोबर खूपच टेस्टी लागतात. एकदा हे पराठे बनवून पहा, तुम्ही ते परत परत बनवाल.
हेही वाचा :
▪︎ हा खास पदार्थ वापरून बनवा चार दिवस टिकतील असे मेथीचे मऊसूद आणि टेस्टी पराठे.