Monsoon Hair Care Tips : पावसाळा सुरु झालाय आणि नाही म्हणलं तरी केसांची थोडी फार समस्या प्रत्येकाला जाणवते. पावसाळ्यात खाली दिलेल्या काही टिप्स वापरून तुम्ही तुमचे केस अगदी छान ठेवू शकता.
- केस कोरडे ठेवा : पावसामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही भिजाल तेव्हा केस व्यवस्थित पुसून कोरडे करावेत.जेणेकरून पावसाच्या पाण्याने तुमच्या केसांचा पी.एच बॅलन्स बिघडणार नाही
- तेलाचा वापर कमी करा : पावसाळ्यात आपले केस जास्त प्रमाणामध्ये तेल सोडतात.त्यातच जर तुमचे केस तेलकट असतील तर केसांमध्ये ओव्हर ऑइल अबसॉबशन होऊन केसांना फाटे फुटतात व केस तुटतात हे टाळण्यासाठी केसांना आठवड्यातून एकदाच ऑइलिंग करा. आणि दुसऱ्या दिवशी लगेच केस धुवून टाका.
- केस धुण्यासाठी कडीनिंबा चा वापर करा : पावसाच्या पाण्यामुळे केसांच्या भांगामध्ये फंगल इन्फेकशन होऊ नये म्हणून केस धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये कडीनिंबा ची पाने घालावीत.
- सौम्य शाम्पू ने केस धुवा : केस पावसात भिजले तर ते तसेच सुकू न देता सौम्य शाम्पू ने धुवा. असे केल्याने केस चिकट होत नाहीत व केसांमध्ये गुंता होणार नाही.
- प्लास्टिक चा किंवा लाकडी कंगवा वापरा : पावसाळ्यात केस विंचरण्यासाठी प्लास्टिक च्या किंवा लाकडी मोठ्या दातांच्या कंगव्याचा वापर करावा. रोलर किंवा छोटे हेअर ब्रश शक्यतो टाळवेत.
हेही वाचा :
• Hair fall home remedies in marathi.