3 सोपे घरगुती उपाय, उंदीर घरातून छू मंतर, परत चुकूनही फिराकणार नाहीत तुमच्या घरी. चला पाहू
Home remedies to kill rats : आपण आपले घर नेहमी स्वच्छ व नीटनेटके ठेवत असतो पण घरातील उंदीर मात्र कायम आपले घर उध्वस्त करण्याच्या प्रयत्नात असतो, घरात घाण पसरवणे, खाद्य पदार्थांचा फडषा पाडणे, कपडे व वस्तू कुरतडणे ही त्याची रोजची त्रासदायक कामे यालाच कंटाळून आपण उंदराणा मारण्यासाठी औषध विकत आणतो व त्यांना मारायचा प्रयत्न करतो. पण जर मी आज तुम्हाला सांगितले कि तुम्ही घरगुती उपाय करून सुद्धा उंदराणा न मारता घरातून हाकलून लावून देऊ शकता, चला तर पाहू…..
उंदीर मारण्यासाठी घरगुती उपाय
How to get rid of mice naturally
तुरटी
तुरटी हा एक जालीम उपाय आहे. तुरटी फोडून तिची पावडर करून त्यात थोडस पाणी मिसळून त्याच मिश्रण तयार करावे व घरात जिथे उंदिर राहतो किंवा त्याचे वास्तव्य आहे तिथे ते मिश्रण शिंपडावे मग बघाच कसे उंदीर घर सोडून पळून जातात ते.
पुदिना
उंदराणा न मारता पळवून लावण्यासाठी तुम्ही पुदिना चा वापर करू शकता कारण उंदराणा पूदिन्याचा वास बिलकुल आवडत नाही, अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी उंदरांचे वास्तव्य असेल तिथे पुदिना ठेवल्यास ते लगेच घरा बाहेर पळून जातील.
कापूर
कापूर हा सुद्धा एक दमदार उपाय ठरू शकतो कारण याचा सुद्धा वास उंदरांना अजिबात आवडत नाही व ज्या कोपऱ्यात उंदीर असतील तिथे कापूर ठेवल्यास ते 100% घरातून पळून जातील.
तसेच चौथा एक विकल्प म्हणजे सहसा लोक त्यांना पकडण्यासाठी पिंजरा वापरतात, त्यात ते त्याना खायचं आमिष दाखवण्यासाठी चपाती, भजी, भाकरी याचा वापर करतात पण सहसा त्यात उंदीर फसत नाहीत या उलट जर तुम्ही ब्रेड च्या तुकड्याला दही लावून पिंजऱ्यात ठेवले तर नक्की ते खायला येऊन उंदीर त्या पिंजऱ्यात फसतील. मग तुम्ही त्यांना पकडून निवांत घराबाहेर सोडून येऊ शकता.
सध्या ट्रेंडिंग 👉