Hair growth home remedy : सर्वानाच वाटते आपले केस सुंदर दाट व मुलायम असावेत. आणि थोड्याशा प्रयत्नाने ते प्रत्यक्षात होऊ शकते.
खाली दिलेला घरगुती उपाय जर तुम्ही आठवड्यातून तीनदा केलात तर तुमचे केस पाहिजे तेवढे लांब तर होतीलच शिवाय मऊ, घनदाट आणि मजबूत बनतील.
▪︎त्यासाठी तुम्हाला लागेल:
☆ 10 ते 12 कडीपत्त्याची पाने, 1 टेबलं स्पून दही आणि 1 टी स्पून ऑलिव्ह ऑइल.
वरील सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सर मधून फिरवून घ्यावेत, गरज असेल तर थोडस पाणी टाकून बारीक पेस्ट बनवून घ्यावी.
तयार झालेली पेस्ट संपूर्ण केसांना हलक्या हाताने लावावी त्यानंतर 20 मिनिटांनी कोमट पाण्याने केस धुवावेत.
असे एक महिना आठवड्यातून तीनवेळा केल्यास तुम्हाला खूप छान रिजल्ट मिळेल.
#केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय.