Whatsapp New Features : जर तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल तर तुम्हाला आत्तापर्यंतचे सर्वात मोठे फीचर मिळणार आहे. व्हाट्सअप या फीचरची घोषणा स्वत: मेटा आणी फेसबुक चे सीईओ मार्क झुकरबर्गने केली आहे. युजर्सना व्हॉट्सॲप मल्टी अकाउंटची सुविधा मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे तुम्ही एकाच एप्लीकेशन मध्ये दोन वेगवेगळी खाती वापरू शकता.
आजच्या धकाधकीच्या जीवनात एकमेकांना भेटण्यासाठी वेळ काढणे खूप अवघड काम झाले आहे. अशा परिस्थितीत आपल्या मित्र-मैत्रिणींशी किंवा नातेवाईकांशी कनेक्ट राहण्यासाठी व्हाट्सअप हा एक महत्त्वाचा मार्ग बनला आहे. आज 2 दशलक्षाहून अधिक लोक व्हाट्सअप वापरत आहेत. हेच लक्षात घेता युजर्सना एक मोठे फीचर दिले आहे. आता तुम्ही एकाच व्हाट्सअप एप्लीकेशन मध्ये दोन नंबरसह वेगवेगळी 2 खाती वापरू शकता.
लवकरच तुम्हाला एकाच व्हॉट्सॲप मध्ये दोन खाती तयार करण्याची सुविधा मिळणार आहे. व्हाट्सअप या धमाकेदार फीचरची माहिती स्वत: मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे.
व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना व्हाट्सअप खाती स्विच करण्याचा पर्याय मिळेल. वापरकर्ते दोन भिन्न क्रमांकांसह खाती तयार करण्यास सक्षम असतील आणि एका खात्यातून दुसर्या खात्यात सहजपणे स्विच करू शकतात. या वैशिष्ट्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात स्विच करण्यासाठी, पहिल्या खात्यातून लॉग आउट करण्याची आवश्यकता नाही.
मार्क झुकरबर्गने दिली माहिती
व्हॉट्सॲप च्या या फीचरबाबत मार्क झुकरबर्गने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे. या स्क्रीनशॉटमध्ये एकाच ॲपमध्ये चालणारी दोन खाती स्पष्टपणे दिसू शकतात.
व्हॉट्सॲप वर येणारे मल्टी अकाऊंट फीचर इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आधीच अस्तित्वात आहे म्हणजेच X. कंपनी टप्प्याटप्प्याने सर्व वापरकर्त्यांसाठी हे वैशिष्ट्य हळूहळू आणेल. व्हाट्सअप दोन नंबर असलेले खाते तयार करण्यासाठी दोन्ही क्रमांक सक्रिय असणे आवश्यक आहे.
👉 रॉकी भाई परत येतोय KGF 3 घेऊन, पहा कधी येतोय सिनेमाघरात…
👉 Google Pay Loan : लोन हवाय? आता गुगल पे वरच मिळणार इन्स्टंट लोन, हफ्ता फक्त्त 111/-. जाणून घ्या कसे.