Samsung Galaxy F04 स्मार्टफोन: तुम्ही कमी किमतीत चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. सध्या, Samsung Galaxy F04 फोन फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज च्या अंतर्गत मोठ्या सवलतींसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनमध्ये तुम्हाला अनेक अप्रतिम फीचर्स पाहायला मिळणार असून या फोनमध्ये 4 GB रॅम आणि 13 MP कॅमेरा आहे. हा फोन तुम्ही फक्त 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता चला तर पाहूया कसे?
Samsung Galaxy F04 वर भरघोस ऑफर्स
Samsung Galaxy F04 हा फोन तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर कमी किमतीत खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची किंमत 11,499 रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवरून बिग बिलियन डेजमुळे 43 % सवलत सवलत मिळाल्यामुळे हा फोन तुम्हाला फक्त 6,499 रुपयांना खरेदी करता येईल. बँक ऑफर्स अंतर्गत या स्मार्टफोनवर आणखी ज्यादा बचत देखील करता येऊ शकते जसे तुम्ही Axis Bank क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास, तुम्ही नवीन फोनवर अतिरिक्त 10 % सूट मिळणार आहे.
तुम्ही तुमचा जुना फोन फ्लिपकार्ट वर एक्सचेंज ऑफर मध्ये देऊन नवीन फोन खरेदी करू शकता. जवळपास साडेसहा हजार रुपये पर्यंतचा डिस्काउंट तुम्ही एक्सचेंज द्वारे मिळू शकता.
Samsung Galaxy F04 ची वैशिष्ट्ये
सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले असून या स्मार्टफोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले उपलब्ध आहे. यासोबतच यामध्ये रॅम प्लस फीचरही देण्यात आले आहे. याची एकूण रॅम 8 GB पर्यंत आहे. या स्मार्टफोनमध्ये 64 GB इंटरनल स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helios P35 प्रोसेसर आहे. ज्यामध्ये 13 MP कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा दुसरा डेप्थ कॅमेरा आहे. पॉवरसाठी स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी बसवण्यात आली आहे. जी या फोनला एक उत्तम स्मार्टफोन बनवण्यास मदत करते.

👉 आता रिचार्ज विसरा! रिलायन्स जिओ देत आहे अनलिमिटेड 5g डाटा….
👉 सरकारकडून Android मोबाईल युजर्सना ‘क्रिटिकल वॉर्निंग’ जारी; वाचून सर्वाना एकच धक्का!.