Smartphone Under 20K : फ्लिपकार्ट वर आज बिग बिलियन डेज सेलचा शेवटचा दिवस आहे. तुम्हाला एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असल्यास 20,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये प्रीमियम लुक आणि अनेक वैशिष्ट्यांसह स्मार्टफोन उपलब्ध आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी काही खास पर्याय घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया 20000 च्या खाली कोणते चांगले स्मार्टफोन आहेत?
Moto Edge 40 Neo
या फोन ला 6.55-इंचाचा डिस्प्ले मिळतो जो वक्र किनार्यांसह फुल एचडी+ रिझोल्यूशनमध्ये आहे. याचा 144 Hz चा रिफ्रेश रेट देखील आहे. जे 1,300 निट्सच्या पीक ब्राइटनेससह HDR10+ सपोर्टसह येते. यात MediaTek Dimensity 7030 प्रोसेसर आहे, जो 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो.
5,000mAh च्या शक्तिशाली बॅटरीमध्ये उपलब्ध आहे जे USB-C TYPE पोर्टसह 68W फास्ट चार्जिंगला( fast charging )समर्थन देते. हा मोबाईल अँड्रॉइड ओएस 13 ला सपोर्ट करतो मोबाईलची किंमत 19,999 रुपये आहे.
Samsung Galaxy A14 5G
या फोन ची किंमत 17999 रुपये आहे, जी 6.6 इंच HD+ डिस्प्लेसह येते. जो 90 Hz चा रिफ्रेश दर आहे. हा फोन सुद्धा अँड्रॉइड os 13 वर चालतो. 2.5ghz octa कोर प्रोसेसर आहे. यामध्ये 5000mah ची बॅटरी आहे. 50+2+2 mp असा कॅमेरा ही उत्कृष्ट आहे.
realme narzo 60 5g
मोठ्या 6.72-इंच IPS LCD डिस्प्ले स्क्रीनसह येते. जे 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते, यामध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 6100+ 5G चिपसेट मिळेल. यासह, यात 6GB/6GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 13 च्या आधारावर कार्य करत असून त्याची खरेदी किंमत 16,499 रुपये आहे.

👉 सरकारकडून Android मोबाईल युजर्सना ‘क्रिटिकल वॉर्निंग’ जारी; वाचून सर्वाना एकच धक्का!.