Mobile Network Not Available : नेटवर्कच्या समस्यांसाठी अनेक वेळा टेलिकॉम कंपन्या जबाबदार असतात तर कधी फोनच्या सेटिंग्जमध्ये सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो. तुमच्या फोनमध्ये नेटवर्कची समस्या असल्यास ही बातमी आहे तुमच्यासाठी, वाचा.
आज देशात 5G नेटवर्क आहे ज्यावर दूरसंचार कंपन्या अल्ट्रा स्पीडचा दावा करत आहेत पण वास्तवात पाहायला गेलं तर असे बिलकुल नाही. (Mobile Network not available )आजही लोक मोबाईल नेटवर्कमुळे खूप त्रस्त आहेत. काही लोक खराब नेटवर्कमुळे फोनवर नीट बोलू शकत नाहीत आणि काही लोकांना इंटरनेट अजिबात येत नाही आणि आले तर ते एकदम हळू चालते.
जर तुमच्याही फोन मध्ये नेटवर्क चा प्रॉब्लेम असेल, मोबाईल नेटवर्क नॉट अवेलेबल, असा काही संदेश येत असेल तर खालील पद्धतीने तुम्ही तो दूर करू शकता.
फोन रीस्टार्ट करणे
नेटवर्क समस्यांवर पहिला उपाय म्हणजे तुमचा फोन रीस्टार्ट करणे. रीस्टार्ट बटणाने फोन रीस्टार्ट करण्याऐवजी फोन बंद करा म्हणजे स्विच ऑफ करा आणि नंतर चालू करा
सिग्नल स्ट्रेंथ
तुमच्या फोनवरील सिग्नलची ताकद तपासा. जर तुमच्या क्षेत्रातील कव्हरेज चांगले नसेल तर नेटवर्क समस्या अपरिहार्य आहे. अधिक समस्या असल्यास तुम्ही कंपनीकडे तक्रार करून नेटवर्क बूस्टर इन्स्टॉल करून घेऊ शकता.
एरोप्लेन मोड
तुम्हाला नेटवर्क समस्या येत असल्यास, तुम्ही फ्लाइट मोड एकदा चालू आणि बंद करू शकता. हे नेटवर्क पुन्हा स्थिर करण्यास मदत करते. व असे केल्याने नेटवर्क पुन्हा पकडण्यास मदत होते.
सॉफ्टवेअर अपडेट्स
तुमच्या फोनमध्ये काही अपडेट असेल तर लगेच अपडेट करा. याशिवाय तुम्ही फोनचे नेटवर्कही रिसेट करू शकता.
रीसेट सेटिंग्ज
तुम्ही सेटिंग या ऑप्शन मध्ये जाऊन रिसेट ऑल सेटिंग्स हा ऑप्शन केल्यामुळे तुमचे सेटिंग पूर्ण फोनची सेटिंग पूर्वता नवीन मोबाईल प्रमाणे होतील.