Jail | Google Search चा वापर करताना आपल्या बुद्धीचा वापर करणे सुद्धा तितकेच जरुरी आहे. असे न केल्यास असे काही आक्षेपार्य सर्च केल्यास तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागू शकते कदाचित तुम्हाला तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या गोष्टी..
मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : आज काल आपण प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी गुगल करतो. गुगलवर आपल्याला सर्वच गोष्टीची सर्व प्रकारे माहिती मिळते. एखादा पत्ता शोधण्यापासून ते कोणत्याही शब्दाचा अर्थ, रेसिपी, किंवा कोणत्याही वस्तूची किंवा कोणतीही माहिती गुगल आपल्याला क्षणार्धात आपल्याला हव्या त्या भाषेत उपलब्ध करून देते पण गुगलवर काही पण सर्च करणे धोक्याचे ठरु शकते. तसें न केल्यास तुरुंगाची वारी होऊ शकते त्यामुळे Google Search करताना 100 वेळा विचार करावा लागू शकतो.
बॉम्ब
जर तुम्ही गुगलवर बॉम्ब कसा बनवायचा अथवा बॉम्ब बनवण्याचे प्रकार किंवा बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य जर असं सर्च केले तर नक्कीच लवकरात लवकर पोलीस तुमच्या घरी येऊन तुम्हाला उचलून नेऊ शकतात. बॉम्ब बनवणे हे आपले वैयक्तिक काम नसून त्याबद्दल माहिती गोळा करणे हा गुन्हा आहे.
अ-श्ली-ल व्हिडिओ कंटेट
वेळोवेळी Google विविध अ-श्ली-ल व्हिडिओ साइट्सवर बंदी घालतच असते, पण तरीही रोज नवनवीन साइट्स तयार होतच असतात. अशा या अ-श्ली-ल कंटेंटला सर्च करणे सुद्धा धोक्याचे ठरू शकते.
फिल्म पायरसी
चित्रपट पायरसी एक गुन्हा असून गुगल सर्चच्या मदतीने तुम्ही अशा प्रकारात अडकला तर अडचणीत येऊ शकता. चित्रपट बनवताना निर्मात्यांना अक्षरशा घर घाणवत ठेवून पैसे गोळा करायला लागतात व तो पिक्चर जेव्हा चित्रपटगृहात चालतो तेव्हा त्यांची कमाई होते पण तुम्ही त्याला आधीच गुगल सर्च च्या मदतीने जर लिक करण्याचा प्रयत्न केला तर निर्मात्यांचे व त्याचे चित्रपटाचे प्रचंड मोठ्या नुकसान होऊ शकते अशा वेळेस चित्रपट पायरसी प्रकरणात जेल सुद्धा होऊ शकते.
हॅकिंग आणी फिशिंग
तुम्ही गुगल सर्चवर कोणाला किंवा कोणत्या सिस्टीमला, मोबाईलला, संगणकाला किंवा ऑफिसला हॅक कसे करणे असे सर्च केले किंवा दुसऱ्या कोणाला इंटरनेट, ओटीपी, बँकिंग प्रकरणात फसवून डिजिटल गैरव्यवहार करण्याचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच जेलची सवारी होऊ शकते.
बेकायदेशीर संघटना
काही दहशतवादी संघटना किंवा काही समाजकंटकी कारस्थान करणाऱ्या संघटना अथवा त्यांचे लीडर किंवा मोरक्या यांच्या बद्दल सातत्याने माहिती गोळा करणे किंवा गुगल सर्च करणे धोक्याची ठरू शकते. असे केल्यास ती माहिती पोलिसांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागत नाही.
त्यामुळे गुगल सर्च हा ज्ञानाचा आणि माहितीचा जरी अखंड स्त्रोत असला तरी त्याचा वापर हा चांगल्या कामासाठीच करावा व असल्या फालतू कारणांवर गुगल सर्च करून आपला इज्जतीचा, आपल्या वेळेचा व आपल्या पैशांचा दुरुपयोग करून घेऊ नये.
