Aadhaar Biometric Lock : आधार कार्ड हे आज कल एक महत्त्वाचे ओळखपत्र बनले असून ते पॅन कार्ड आणि बँक अकाउंट शी लिंक करण्यात आले आहे. आणि तुम्हाला माहित असेलच की आधार कार्ड बनवताना तुम्हाला डोळ्यांची ओळख आणि हाताचे फिंगरप्रिंट्स घेतले जातात. आणि आज-काल ऑनलाइन फसवणुकीची पण संख्या वाढतच चालली आहे. मग अशा काळात हे लोक आधार कार्ड आणि तुमच्या हातांच्या ठशांचा वापर करून तुमचे बँक अकाउंट रिकामा करू शकतात. यातूनच वाचण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगत आहोत.
(Aadhaar Lock) आधार लॉक हे एक वैशिष्ट्य अथवा Security फिचर आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे बायोमेट्रिक्स लॉक करू शकता. म्हणजे तुमच्या आधार कार्डच्या फिंगरप्रिंट्स अथवा ठसे व त्यामुळे होणारे काम हे तुम्हाला हव्या तेवढ्या वेळासाठी लॉक करता येईल यामुळे तुमचा गोपनीय डेटा सुरक्षित राहील. आधार ऑनलाइन सहजपणे लॉक करता येतो.
आधार कार्ड (Aadhaar Card) हे देशातील जवळपास प्रत्येक नागरिक ओळखपत्र म्हणून वापरतात. याद्वारे तुम्ही कोणत्याही सरकारी सेवेचा सहज लाभ घेऊ शकता. त्याच वेळी, सिम खरेदी करण्यापासून तिकीट बुकिंगपर्यंत आणि नवीन बँक खाते उघडण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये याचा वापर केला जातो. या कारणास्तव, सरकार आधार शक्य तितके सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी आधार जारी करणारी सरकारी एजन्सी UIDAI ने आधार लॉक नावाचे एक खास फीचर दिले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे बायोमेट्रिक्स देखील लॉक करू शकता तुम्हाला हव्या तेवढ्या वेळेसाठी.
आधार बनवताना कोणत्याही व्यक्तीकडून बायोमेट्रिक्स घेतले जातात. यामध्ये चेहरा, बोटांचे ठसे आणि डोळे यांचा समावेश आहे. आधार डेटा पूर्णपणे सुरक्षित असला तरी, तुम्ही आधार लॉकद्वारे त्याची सुरक्षा आणखी वाढवू शकता.
आधार बायोमेट्रिक लॉक करण्याचे फायदे | Aadhaar Lock Benefits
आधार लॉक करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की जर तुमचा आधार चुकीच्या व्यक्तीच्या किंवा फसवणुकीच्या हातात गेला तर तो त्याचा गैरवापर करू शकेल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही खूप प्रवास करत असाल, तर आधारचे बायोमेट्रिक्स लॉक करणे हा एक चांगला निर्णय असू शकतो आणि तुम्ही तुमचा डेटा अधिक सुरक्षित करू शकता. यामुळे आधारशी लिंक केलेले तुमचे बँक खाते इत्यादींची माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचणार नाही.
आधार बायोमेट्रिक लॉक कसे कराल | Way To Lock Aadhaar Biometric
Aadhaar biometric lock करण्यासाठी तुम्हाला यूआईडीएआई ( उदाई ) च्या वेबसाइट वर जाव लागेल.
त्या नंतर ‘My Aadhaar’ या विभागात मध्ये जाऊन आधार सर्विसेस वरती क्लिक कराव लागेल.
यानंतर तुम्हाला लॉक अँड अनलॉक बायोमेट्रिक वरती क्लिक कराव लागेल.
यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर कॅपच्या कोड हे भरावा लागेल आणि त्यानंतर जनरेट ओटीपी यावर क्लिक करावे लागेल. आणि त्यानंतर OTP टाकून तुम्हाला ते सबमिट कराव लागेल.
त्यानंतर Enable Locking Feature या ऑपशन वर क्लिक कराव लागेल. अशा पद्धतीने तुम्ही आधार बायोमेट्रिक लॉक करू शकता.
आणी त्यानंतर जेव्हा तुम्हाला तुमचे आधार परत अनलॉक करायचे असेल तर सेम अश्याच पद्धतीने ते अनलॉक करावे.
तुमच्या बँकेतील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आधारच्या ‘या’ फीचरचा वापर नक्कीच करा .
👉 Viral Video : ‘आमच्या पप्पांनी आयफोन आणला…’; चिमुकलीचा हा व्हायरल व्हिडीओ पाहिला का?.
👉 Diwali Bonus 2023: सरकारने केंद्रीय कर्मचार्यांसाठी दिवाळी 2023 बोनस जाहीर केला, पण ‘या आहेत अटी’.