सायबर गुन्हेगाराने सर्वप्रथम राजूशी त्याच्या टेलिग्राम अकाउंटवरून संपर्क साधला. व्हिडिओला लाईक करून मोठी रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून राजूला जाळ्यात ओढले आणि त्यानंतर त्याच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आली.
सायबर फसवणूक आणि ऑनलाइन नोकरी घोटाळ्याच्या घटनांमध्ये आता वाढ होत आहे. सर्वसामान्य लोक घोटाळेबाजांच्या जाळ्यात अडकून लाखो रुपयांचे नुकसान करत आहेत. असेच एक सायबर फसवणुकीचे नवे प्रकरण समोर आले असून, त्यात नागपुरातील एक ५६ वर्षीय व्यक्ती या फसवणुकीचा शिकार बनला आहे. पीडित व्यक्तीची सुमारे ७७ लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे.
अशाप्रकारे झाली सायबर फसवणूक
नागपुरातून 56 वर्षीय सारीकोंडा राजू हा व्यक्ती सायबर फ्रॉडचा बळी ठरल्याची एक नवीन घटना समोर आली आहे. या फसवणुकीत राजूला सुमारे 77 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. सायबर गुन्हेगाराने सर्वप्रथम राजूशी त्याच्या टेलिग्राम अकाउंटवरून संपर्क साधला. व्हिडिओला लाईक करून पैसे कामावण्याचे आमिष दाखवून राजूला आपल्या जाळ्यात ओढले. प्रथम राजूला यूट्यूब व्हिडिओ लाइक करून त्याचा स्क्रीनशॉट शेअर करण्यास सांगितले होते.
सांगितल्याप्रमाणे राजूने यूट्यूब व्हिडिओ लाइक करूनत्याचे स्क्रीनशॉट त्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पाठवले,
राजूला सुरुवातीला काही पैसेही मिळाले. पैसे मिळाल्याने राजूचा त्या कामावर आणी त्या व्यक्तीवर विश्वास बसला जास्त पैसे कामावण्याच्या अमिषाने राजूने एक पाऊल पुढे टाकले आणि त्याच्या बँक खात्याचे डिटेल्स त्या व्यक्तीला पाठवले, मात्र पुढे घडले उलटेच. फसवणूक करणाऱ्याला राजूच्या बँक खात्याची माहिती मिळताच त्याने राजूच्या खात्यातून मोठी रक्कम काढली.
अशा सायबर फसवणुकीपासून सावध रहा
अशी कोणतीही फसवणूक टाळण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तुम्ही तुमचे बँक डिटेल्स किंवा OTP कोणत्याही अनोळखी व्यक्तीला शेअर करू नका. तुम्हाला कोणताही कॉल आला व आपले बँक डिटेल्स, आधार नंबर, OTP, कोणीही मागत असेल तर ती माहिती देऊ नका.
👉 Viral Video : ‘आमच्या पप्पांनी आयफोन आणला…’; चिमुकलीचा हा व्हायरल व्हिडीओ पाहिला का?.