India vs Pakistan world cup: टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सलग 8 वेळेस पाकिस्तानचा फडषा पाडला. विश्वचषक 2023 (world cup 2023) च्या 12 व्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर 7 गडी राखून मोठा ऐतिहासिक विजय मिळविला. कर्णधार रोहित शर्माने 86 धावांची शानदार तर श्रेयस आयरने नाबाद 53 धावांची खेळी केली यानंतर टीम इंडियाच्या विजयानंतर प्रेक्षकांबरोबरच खेळाडूंनी सुद्धा जल्लोष साजरा केला.
टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग तिसरा विजय प्राप्त केला असून सेमी फायनल चा मार्ग एकदम सोपा झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. विश्वचषक सामन्यात भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान पहिला सामना 1992 ला झाला होता आणि आता 2023 मध्ये 31 वर्षात एकूण आठ सामने झाले व त्या आठ सामन्यात पाकिस्तानला एक ही विजय मिळवता आला नाही. कालच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली व पाकिस्तानचा फक्त 191 धावात धुवा उडविला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 31व्या षटकात 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावांची जलद खेळी केली. 7 षटकात 19 धावा देऊन 2 बळी घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला.
सामन्यानंतरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू विजयाचा आनंद साजरा करताना दिसून येत आहेत. यावेळी विराट कोहली, रोहित शर्माची पत्नी रितिका, अनुष्का शर्मा आणि रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांनीही या विजयाचा आनंद लुटला. यादरम्यान कोहली आणि रितिका मिठी मारताना दिसत आहेत. त्यानंतर विराटही पत्नी अनुष्काकडे बोट दाखवताना दिसत आहे.
Video :
हे देखील वाचा 👉 भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ‘इतक्या’ कोटी लोकांनी थेट पाहिला, OTT प्लॅटफॉर्मवर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे.
आता बांगलादेशशी सामना होणार आहे
टीम इंडिया सलग 3 विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचली असून भारताने प्रथम 5 वेळचा चॅम्पियन संघ ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने पराभव केला. त्यानंतर अफगाणिस्तानवर 8 गडी राखून विजय नोंदवला. आता पाकिस्तानचा पराभव केला. टीम इंडियाचा चौथा सामना 19 ऑक्टोबरला बांगलादेशशी होणार आहे. हा सामना पुण्यात होणार आहे.
वर्ल्ड कप 2023 बद्दल बोलायचे झाले तर, आज अफगाणिस्तान आणि इंग्लंड दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. इंग्लिश संघाने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांमध्ये एक सामना जिंकला आहे, तर स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, अफगाणिस्तान संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. बांगलादेश आणि भारताविरुद्ध तो पराभूत झाला.