IND vs PAK वर्ल्ड कप 2023: (World cup 2023) वर्ल्ड कप 2023 ला 5 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली असून या वर्ल्डकप मधील सर्वात प्रेक्षणीय सामना आज 14 ऑक्टोबरला गुजरात मधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान खेळला जाणार आहे. पाकिस्तानी खेळाडूंवर भारतात खेळण्यासाठी बंदी घातल्यानंतर जवळपास पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानचे खेळाडू भारतात क्रिकेट वर्ल्ड कप 2023 खेळण्यासाठी दाखल झाले आहेत.
Points Table world cup 2023: गुणतालिकेवर नजर घातली तर न्युझीलँड ही सहा अंकासह प्रथम स्थानी असून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ चार गुणांवर आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असून विशेष बाब म्हणजे वर्ल्डकप मध्ये पाकिस्तानला भारतावर गेल्या सात सामन्यात एकही विजय मिळवता आलेला नाही.
India vs Pakistan worldcup 2023: भारत आणि पाकिस्तानचा सामना हा नेहमीच रोमांचक आणि थरारक होत असतो. आज नाणेफेक जिंकल्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार काय निर्णय घेतात यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल. टॉस जिंकल्यानंतर दोन्ही कर्णधार बॉलिंग घेण्याचा प्रयत्न करतील कारण या मैदानावर फलंदाजी करणे सोपे असल्यामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी करताना दिलेले लक्ष सहज गाठता येऊ शकते.
त्यामुळे भारताचा कर्णधार (India captain )रोहित शर्माला नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घ्यावी लागेल. जसप्रीत बुमराह आणि जगातील एक नंबरचा गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्या जोडी पुढे पाकिस्तानचा निभाव लागतो का नाही हे पाहणे रोमांचक असेल. शिवाय दुसऱ्यांदा फलंदाजी करताना रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि चेसमास्टर विराट कोहली (Virat Kohli )यांनाही विसरून चालता येणार नाही. त्यामुळे भारताने जर प्रथम गोलंदाजी (Bowling) घेतली तर हा सामना निश्चितच आपण जिंकू शकतो असे तज्ञांचे मत आहे.
India vs Pakistan Toss :
त्यामुळे हा आजचा भारत पाकिस्तान वर्ल्डकप चा सामना जर भारताला जिंकायचा असेल तर नाणेफेक (Toss)जिंकणे आणि त्यानंतर गोलंदाजी घेणे हे जरुरी आहे.