World Cup Today Match : भारतीय संघाचा धावपटू विराट कोहली आज म्हणजेच ५ नोव्हेंबरला ३५ वर्षांचा झाला. यावेळी संपूर्ण देश कोहलीस वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. पण विराटसाठी खरे बर्थडे गिफ्ट म्हणजे ईडन गार्डनवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय असेल.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि रन मशीन विराट कोहली आज 5 नोव्हेंबर रोजी आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र, किंग कोहलीच्या वाढदिवसाच्या दिवशी भारतीय संघ कोलकात्याच्या ईडन गार्डनवर दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. दोन्ही संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.
कोलकात्यात जो संघ जिंकेल तो प्रथम क्रमांकावर येईल. या विश्वचषकात भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. आता दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याची पाळी आली असून आज किंग कोहलीचे नशीबही आपल्यासोबत आहे. कारण विराट कोहलीचा वाढदिवस भारतीय संघासाठी खूप लकी आहे. आतापर्यंत टीम इंडियाने त्याच्या वाढदिवसादिवशी खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत.
2015- 5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
2015 मध्ये, विराट कोहलीच्या वाढदिवशी, भारताने मोहालीमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी सामना खेळला होता. टीम इंडियाने हा सामना 108 धावांनी जिंकला.
2021-5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध स्कॉटलंड
2021 मध्ये विराट कोहलीच्या वाढदिवशी, भारताने स्कॉटलंडविरुद्ध टी-20 विश्वचषक सामना खेळला. या सामन्यात भारतीय संघाने 8 गडी राखून मोठा विजय नोंदवला होता.
त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की विराट कोहलीचा वाढदिवस टीम इंडियासाठी लकी आहे. अशा परिस्थितीत ईडन गार्डनवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा विक्रम अबाधित राहतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. किंग कोहलीला सचिन तेंडुलकरच्या शतकांची बरोबरी करण्याची चांगली संधी आहे.
👉 IND VS SA: आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ जाहीर! ऋषभ पंतबद्दल मोठी बातमी.