Post Office job : एजंट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवलेले कमिशन आणि प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना परवाना परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
Post Office job : जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर हे वाचाच. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतून असे माहीत होत आहे की पोस्टल लाईफ इन्शुरन्स अंतर्गत भरती सुरु असून येथे दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तर या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
मुंबईतील टपाल जीवन विमा, मुंबई अंतर्गत अभिकर्ता या पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यात आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला मार्केटिंग क्षेत्राचा अनुभव असावा. ही नोकरी सरकारी नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
एजंट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवलेले कमिशन आणि प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना परवाना परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांना परवाना दिला जाणार आहे. उमेदवारांना तात्पुरत्या परवान्यासाठी 50 रुपये आणि परवाना परीक्षेसाठी 400 रुपये भरावे लागतील एजंट पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा नसून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान तसेच संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई – 400057 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाणार असून उमेदवारांनी मुलाखतीला येताना शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड,आधार कार्ड (मूळ प्रत आणि 1 झेरॉक्स), 3 फोटो आणि अन्य 3 महत्वाचे दस्तावेज आणणे गरजेचे आहे.
अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास नोकरी नाकारण्याचा अधिकार कार्यालयाकडे राहील, याची उमेदवारांनी नोंद घावी.
