Tomato Prices : काही दिवसांपूर्वी 200 रुपये प्रति किलो भावाने विकला जाणारा टोमॅटो आज 2 ते 5 रुपये किलो या भावाने विकला जातोय, इतक्या प्रचंड प्रमाणात टोमॅटोच्या किमती उतरल्याने टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.
Tomato Prices : 200 रुपये प्रति किलोनं विक्री होणारा टोमॅटो (Tomato) सध्या 2 रुपये किलोने विकला जातोय. म्हणजेच काहीच दिवसातच टोमॅटो च्या किंमती 100 पटीने कमी झाल्याच पाहायला मिळतय. इतक्या प्रचंड प्रमाणात टोमॅटो ची किंमत (Tomato Price ) घसरल्याने टोमॅटो उत्पादत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळेच टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक होत आहेत. सरकार टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता काय करणार असा प्रश्न देखील शेतकरी विचारात आहेत.
टोमॅटोच्या वाढत्या उत्पादनामुळे अजून दर उतरण्याची भीती
Tomato price drop: काही काळापूर्वी गगनाला भिडलेल्या टोमॅटोच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने नेपाळहून टोमॅटोची आयात केली खरी पण त्यामुळच 100-200 रुपये किलो विकला जाणारा टोमॅटो आज 2-5 रुपये किलो वर येऊन आपटला. सरकारने टोमॅटोच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी उचललेल्या या पावलामूळ आज टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
ऑक्टोबरमध्ये टोमॅटोचं उत्पादन वाढणार, दरात घसरण होण्याची शक्यता
देशात टोमॅटोच्या किंमती वाढल्यानंतर सरकारनं किंमती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलली. सरकारनं नेपाळहून टोमॅटोची आयात केली. परिणामी (Tomato rate) टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली. कृषी मंत्रालयाकडून अस सांगण्यात आल आहे की तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणी हिमाचल प्रदेश या राज्यांत या महिन्यात आणी पुढच्या महिन्यात टोमॅटोचे मोठे उत्पादन होणे अपेक्षित आहे. सप्टेंबर 2023 मध्ये टोमॅटोचे उत्पादन 9.56 लाख टन होण्याची अपेक्षा असून ऑक्टोबरमध्ये 13 लाख टन टोमॅटोचे उत्पादन अपेक्षित आहे.
सरकार टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता काय करणार?
मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, ग्राहक आणि अन्न व्यवहार विभाग शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध राज्यांमधून 10 ते 20 कोटी रुपयांचे टोमॅटो खरेदी करण्याची शक्यता आहे. टोमॅटोच्या आजच्या किमतीमुळे (Tomato price today) शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादणासाठी केलेला खर्च देखील निघेल का नाही अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. माहितीनुसार महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील टोमॅटो उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळेच सरकार टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी टोमॅटो खरेदी करण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारनं नाफेडमार्फत 50 रुपये किलो दरानं टोमॅटो खरेदी करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. जर अस झाल तर टोमॅटो च्या किमतीमूळ (Tomato Prices) हैराण झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळेल.