Onion Prices: देशातील कांद्याच्या भावात नवीन वाढ पहायला मिळत असून किरकोळ बाजारात कांद्याचे भाव जवळपास 50 टक्क्यांनी महागले आहेत. आधी टोमॅटो आणि आता कांद्याचे वाढलेले भाव लोकांना त्रास देत आहेत. ऐन सनासुदीच्या दिवसात या वाढत्या भावांमुळे लोक रडकुंडीस आले आहेत.
Onion Prices: देशात महागाईचा आकडा कमी होत असला जसे की सनासुदीच्या दिवसात सरकार ने LPG सिलेंडर वर जरी 200 रुपये कमी केले असले, डाळी स्थिर ठेवल्या असतील तरी भाज्यांच्या किमतीत मात्र चढ उतार कायम असल्याने सर्वसामान्यांना धक्का बसत आहे. याआधी जुलै-ऑगस्टमध्ये टोमॅटोच्या वाढत्या किमतीने सर्व विक्रम मोडीत काढले आणि 250 ते 300 रुपये किलोपर्यंत पोहोचले. आता कांद्याचे दर सतत वाढत जात असल्याने जनतेचे अश्रू ढळत आहेत. देशातील किरकोळ बाजारात तसेच घाऊक बाजारात कांद्याचे दर नवीन उंची गाठत आहेत.
कांद्याचे भाव किती वाढले?
देशात या 1 जुलै ते आज १९ ऑक्टोबर या कालावधीत कांद्याच्या किमतींची तुलना केली तर तो सुमारे ५० टक्क्यांनी महागला आहे. ग्राहक व्यवहार विभागाने दिलेल्या माहिती नुसार, 1 जुलै 2023 रोजी कांद्याची किरकोळ किंमत 24.17 रुपये प्रति किलो होती, जी आज 19 ऑक्टोबर रोजी 35.94 रुपये प्रति किलो झाली आहे. असे पाहिले तर कांद्याचे दर सरासरी ४९ टक्क्यांनी वाढले आहेत.
महाराष्ट्रातील घाऊक बाजारातही कांद्याची किंमत 30 टक्क्यांनी वाढली आहे
महाराष्ट्रातील घाऊक बाजारातही कांद्याच्या दरात मोठी वाढ होत असून सुमारे ३० टक्के वाढीसह कांद्याची विक्री होत आहे. अवघ्या आठवडाभरात महाराष्ट्रातील घाऊक बाजारात कांदा 30 टक्क्यांनी महागला आहे. येथे गेल्या आठवड्यात कांद्याचे दर 2500 रुपये प्रतिक्विंटल होते, ते या आठवड्यात 3250 रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत.
कांद्याची किंमत का वाढत आहे?
खरिपाची पिके येण्यास उशीर झाल्याने लाल कांद्याची उपलब्धता कमी झाल्याने कांद्याचे भाव नवे उच्चांक गाठत आहेत. पुरवठ्याअभावी कांद्याचे दर सातत्याने वाढत चालले आहेत. त्यामागील मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रात मान्सून उशिरा आला आणि काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी अतिवृष्टी आणि त्यासोबतच कर्नाटकातील कांदा पट्ट्यातही उत्पादन कमी झाले असून, त्याचा परिणाम कांद्याच्या पुरवठ्यावर दिसून येत आहे. अर्थशास्त्रच्या नियमानुसार पुरवठा कमी पडत असल्यामुळे दर वाढत आहेत.