New Schemes For Farmers : शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वीच मोदी सरकार कडून योजनांचा बोनस जाहीर; केंद्र सरकारची मोठी घोषणा 2023
New Schemes For Farmers 2023 : मोदी सरकारने शेतकऱ्यांनासाठी 4 नव्या योजना जाहीर केल्या आहेत, त्या योजना कोणत्या ते पाहूया.
नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 :भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे शेतकऱ्यांवार कायमच लक्ष्य ठेऊन असतात व सतत त्यांची मदत व सह्हाय करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवत असतात. सध्या गणेशउत्सव सुरु झाला असून दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवार शेतकऱ्यांना एक प्रकारचा बोनसच जाहीर केला आहे.
New schemes for Farmers : पीएम नरेंद्र मोदी यांनी सनासुदीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना नवीन योजना व जुन्या काही योजनात बदल करवून दिवाळी आधीच बोनस दिला असे म्हणायला हरकत नाही. या योजना ऑनलाईन व ऑफलाईन अश्या दोनी प्रकारात कार्यरत असून याचा फायदा कोट्यावधी शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत व सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग बघु शेतकऱ्यांसाठी नवीन योजना (New Schemes For Farmers 2023) व कोणता बदल झाला आहे?
घर-घर केसीसी (Door-to-Door KCC)
(Ghar ghar kcc) शेतकऱ्यांना जी सुवर्ण योजना म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड आहे तिचे महत्व आणि फायदे सर्व गावा गावातील खेडो पाड्यातील शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी सरकारने घर घर केसीसी (Door-to-Door KCC) ही योजना हाती घेतली आहे. आता केंद्र सरकार यातच किसान क्रेडिट कार्ड बरोबरच पी एम किसान योजना अंतर्गत वार्षिक मिळणाऱ्या 6000 रुपये बद्दल ही जागरूक करणार आहे.
विंड्स पोर्टल (WINDS Portal)
(WINDS Portal) शेतकऱ्यांनसाठी निसर्ग, ऋतू, हवामान, पाऊस यांवरच देवापेक्षा जास्त अवलंबून राहावे लागते. यांच्या अंदाजाशिवाय त्यांची शेती किंवा पीक हे एक जुगारच जणू. यासाठीच गणेशउत्सव च्या मुहूर्तावार विंड्स पोर्टल म्हणजेच (Weather Information network data system) याची सुरवात केली आहे. हे शेतकऱ्यांना निसर्गाचा अंदाज, पावसाची अपडेट, हवामानातील बदल, वादळाची माहिती, पिकांची माहिती व खत औषधंची माहिती देणार आहे.
केसीसी इनिशिएटिव (KCC Initiatives)
(KCC Initiatives) ही योजना म्हणजे शेतकऱ्यांना केंद्र सरकार 3 लाख पर्यंत कर्ज अगदी कमी व्याजदरात देणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज याची अधिकृत घोषणा केली. या सर्व योजनासाठी सरकारने 20 हजार कोटी ची तरतूद केली आहे.
किसान ऋण पोर्टल (Kisan Rin Portal)
आज दिल्ली मध्ये गणेश चतुर्थी च्या मुहूर्तावर किसान ऋण पोर्टल (Kisan Rin Portal) ची घोषणा करण्यात आली. ज्या लोकांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही त्या लोकांना याचा विशेष लाभ मिळणार आहे. यात नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड चा वापर करण्यात येणार आहे. तसेच जे लोक कर्ज घेऊन वेळेत परतफेड करतील त्यांना सबसिडी च्या रूपाने एक प्रकरे बोनस च मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी या चार नवीन योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत.