Lek Ladki Yojana Maharashtra : बाकी राज्यांप्रमाणे स्त्रियांबाबत व महिलांबाबत तशी गंभीर परिस्थिती नसली तरी सुद्धा महाराष्ट्र सरकार त्यांच्या फायद्यासाठी, हितासाठी, नवनवीन उपक्रम, स्कीम्स, योजना आखण्यास तत्पर असते. शेतकऱ्यांन बरोबरच महिलांना किंवा मुलींना देखील सक्षम बनवणे हा या मागचा उद्देश.
Maharashtra Cabinet Decision: मुलगी जन्माला आल्यावर 5000 तसेच 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार रुपये, मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीतील निर्णय. ही मदत लेक लाडकी या योजनेंतर्गत राज्यातील मुलींना करण्यात येणार असून जाणून घेऊया लेक लाडकी या योजने बाबत सार काही.
Lek Ladki Yojana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मंगळवारी (10 ऑक्टोबर) पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले. शेती संबंधित तर महिलांनसाठी सुद्धा काही चांगले निर्णय घेता आले. मार्च 2023 च्या आर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची (Lek Ladki Yojana) घोषणा झाली होती, आता या योजनेला सुरवात होणार असून या योजनेनुसार, मुलगी जन्माला आल्यापासून ते मुलगी सज्ञान होईपर्यंत तिला आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेनुसार, राज्यात मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये देण्यात येणार आहेत. शिवाय ती मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर मुलीला रोख 75 रुपये देण्यात येतील असे ही मंडळाने सांगितले.
लेक लाडकी योजना पात्रता
या ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना मिळणार आहे. याची नोंद करण्यासाठी मुलीचे जन्मप्रमाण पत्र हे ग्राह्य धरले जाईल. पालकांना आपल्या लेकीचे नाव या योजनेत नोंद करता येते.
लेक लाडकी योजना स्वरूप
कालावधी | रक्कम |
---|---|
जन्माला आल्यानंतर | 5000 |
पाहिलीत गेल्यावर | 6000 |
सहावीत गेल्यावर | 7000 |
आकरावीत गेल्यावर | 8000 |
आठरा वर्षाची झाल्यावर | 75000 |
एकूण रक्कम | 1 लाख 1 हजार |
मुलींसाठी या देखील महत्वपूर्ण योजना
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही सुद्धा एक सुवर्णबचत योजना असून, या अंतर्गत जन्मापासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी खातं उघडता येतं व यावर सध्या 8 टक्के व्याज मिळते. शिवाय तुम्ही 21 वर्षांनंतर संपूर्ण रक्कम काढू शकता.
उडान योजना
उडान योजना (UDAN) ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अंतर्गत सुरू केलेली योजना आहे. 10वी मध्ये किमान 70 टक्के आणि विज्ञान आणि गणित विषयात 80 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थिनी या उडान योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
यासाठी www.cbse.nic.in किंवा www.cbseacademic.in या वेबसाईटवर अर्ज करता येईल.