Tiger 3 : येत आहे मी! “आ रहा हू” जवानाच्या रिलीझ आगोदरच सलमान खानने फोडली डरकाळी; टायगर 3 ची रिलीझ डेट जाहीर.
Salman Khan Tiger 3 सध्या फिल्म इंडस्ट्री मध्ये जेलर आणि गदर 2 चे वारे चालू असताना जवान च्या ट्रेलर ने सर्व सिनेमा प्रेमीचे होश च उडवले आहेत. शाहरुख खान ची दमदार action, सुरेख अभिनय आणि साऊथ कलाकारांची भरमार असलेला जवान प्रेक्षकांना तडपवत आहे जणू, आणि आता त्यातच भर म्हणून भारतातील मोस्ट एलीजीबल बॅचलर भाई जान म्हणजेच सलमान खान ने त्याच्या आगामी टायगर 3 ची रिलीझ डेट चा पोस्टर आऊट करून जणूं हंगामा च केलेला आहे.
आजची ताजी बातमी 👉 उर्फी जावेद चे झाले या सुपरहिट बाॅलिवूड अभिनेत्याशी लग्न.
Salman Khan Tiger 3 Announcement: सलमान खान चा जगभरात एक वेगळाच चाहता वर्ग आहे. शाहरुख च्या पठाणमध्ये टायगरची झलक पाहूनच चाहते टायगर साठी घायाळ झाले होते ते आतुरतेने सलमान च्या टायगर 3 वाट पाहत होते त्यातच टायगर 3 चे पोस्टर्स इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज करताना, सलमान खानने कॅप्शनमध्ये टायगरच्या भूमिकेत येण्याबद्दल सांगून प्रेक्षकांना वेड लावले आहे. यानंतर चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव करत फायर आणि हार्ट इमोजी पाठवायला सुरुवात केली. त्याचवेळी चाहतेही आता बिग बॉस फेम एलविश यादव याच्या भाषेत (System hang,सिस्टिम हँग )यंत्रणा हँग झाल्याचे सांगताना दिसत आहेत.
टायगर, टायगर जिंदा है, वार (war) आणि पठाण हे सर्व सिनेमे YRF( yash raj productions ) यांचेच या सर्व सिनेमात सलमान खान, ऋतिक रोशन आणि शाहरुख खान यांनी जासूस (spy ) ची भूमिका करून जणू काही YRF चे spy वर्ल्ड ची च निर्मिती केली आहे. व प्रेक्षकांना ती खूप पसंद आलेली आहे.
एक था टायगर (2012) ने सर्वप्रथम आपल्याला एक उत्कृष्ट सुपर-स्पाय टायगर उर्फ सलमान खान हा YRF जासूस विश्वाचा बॉस आहे याची जाणीव करून दिली एक था टायगर आणि टायगर जिंदा है च्या यशाने आदित्य चोप्राला आत्मविश्वास दिला की तो दोन सर्वात मोठ्या एजंट्समध्ये, कबीर उर्फ हृतिक रोशन( वार (war)) आणि युद्धातील पठाण उर्फ शाहरुख खान यांच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सामील होऊ शकतो.
Tiger 3 release date: YRF ने आज टायगर 3 चे पहिले पोस्टर आज ऑफिशियली इंस्टाग्राम वर रिलीझ केले आणि दोन सुपर-स्पाय सलमान आणि कतरिना कैफ त्यांच्या सर्वात प्राणघातक मिशनवर निघाले आहेत व ते प्रेक्षकांना एका नवीन ते action ड्रामा च्या रोमांचाची हमी देते. तर येत्या दिवाळी ला हा सिनेमा रिलीझ होणार असून भाई च्या चाहत्यांमदे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चला तर मग पाहूया वाट दिवाळीची.
सध्या ट्रेंडिंग 👉