Shah Rukh Khan Ganpati : शाहरुख खानच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन; शाहरुख खानने शेअर केला फोटो.
Shah Rukh Khan Ganeshotsav 2023 : शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) घरी ‘मन्नत’ मध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही गणपती बाप्पा विराजमान झाले. पूर्ण देशभरात गणेशाच्या आगमनाने आनंदी आणि उत्साही वातावरण आहे. अगदी गरीब कुटुंबापासून ते अंबानी च्या घरात ही आज गणेशाचे अगदी मंगलदायक आगमन झाले आहे. व सर्वजण एकमेकांना गणेशउत्सवाच्या शुभेच्छा देत आपला आनंद व्यक्त्त करत आहेत.
Shah Rukh Khan Welcomes Ganapati Bappa at Mannat : किंग खानने बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्याने बसवलेली बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर असून किंग खानने गणपतीचा बाप्पाचा फोटो शेअर करत चाहत्यांना गणेशोत्सवाच्या (Ganesh Chaturthi 2023) शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहरुखचा बाप्पा पाहिलात का? (Shah Rukh Khan Post On Ganeshotsav 2023) | Shahrukh khan ganpati
‘जवान’ (Jawan) फेम शाहरुख खानने गणपती बाप्पाचा फोटो सोशल मीडिया अर्थात इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,”गणपती बाप्पाचं घरी स्वागत करत आहोत, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना सुख, समृद्धी, बुद्धी, उत्तम आरोग्य आणि भरपूर मोदक खाण्यासाठी गणपती बाप्पा सर्वाना आशीर्वाद देवो”. शाहरुखची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून खूप सेलिब्रिटींसह असंख्य चाहत्यांनीं त्यांच्या पोस्टवर लाईक्स चा वर्षाव करत लाडक्या सुपरस्टारला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहरुख खान हा जरी मुस्लिम असला तरी दिवाळी, गणेशोत्सव, नवरात्र, नाताळ असे सर्वच सण तो जल्लोषात साजरे करत असतो. धर्मनिरपेक्ष अभिनेता म्हणून खास ओळख असलेल्या शाहरुखला चाहत्यांच कायमच भरभरून प्रेम मिळतं असते. त्याच्या गणपती बाप्पाच्या पोस्टवर अश्या भरपूर कंमेंट्स पाहायला मिळतायेत जसे कि एकतेचे उदाहरण म्हणजे शाहरुख खान, धर्मनिरपेक्ष अभिनेता, देशात बंधुभावाची शांती नांदू दे, एकच खान शाहरुख खान अशा कमेंट्स मधून त्याने नेटकऱ्यांची मने जिंकल्याच दिसून येते.
Shah Rukh Khan Ganpati | शाहरुख खान गणपती
बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या ‘जवान’ चा धुरळा (Shah Rukh Khan Jawan Box Office Collection)
बॉलिवूडचा बादशाह असणाऱ्या किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा ‘जवान’ (Jawan) हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने आजवर 550 कोटी पेक्षा जास्त कमाई केली असून जगभरात जवळपास 900 कोटींच्या आसपास गल्ला जमवला आहे. ‘जवान’ हा सिनेमा आजवरील सर्व सिनेमाचे रेकॉर्ड मोडेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटातील थरारक एकशन सिन्स, मनोरंजक गाणी, शाहरुख ची दणकेबाज डायलॉग बाजी ही काही प्रमुख आकर्षणे ठरलीत.