Saif Ali Khan च्या ५ हजार कोटींच्या संपत्तीचा वारस कोण? मुलांना मिळणार नाही वाटणी.
Saif Ali Khan | सध्या सैफ अली खान यांची संपत्ती आणी सैफ अली खान यांच्या असणाऱ्या ५ हजार कोटींच्या संपत्तीचा वारस कोण याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. सैफ आली खानची मुले सारा, इब्राहिम, तैमूर, जेह यांच्यात वाटणी होऊ शकत नाही. त्याच नेमक कारण काय असा प्रश्न सर्वांनाच पडत असेल. चला जाणून घेऊया त्याच नेमक कारण…
Saif Ali Khan, बॉलीवूड स्टार सैफ अली खान हा पतौडी कुटुंबातील १० वा नवाब आहे. त्यामुळेच सैफ अली खानकडे अपार संपत्ती आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हरियाणा येथील पतौडी पॅलेस आणि भोपाळ मधील संपत्ती मिळून अभिनेत्याकडे तब्बल ५ हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबाचे राहणीमान अगदी रॉयल असते. सैफ अली खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतोच. सध्या त्याच्या ५ हजार कोटींच्या संपत्तीच्या चर्चेला उधाण आले आहे.
सैफ अली खान संपत्तीची वाटणी त्याच्या चार मुलांमध्ये करू शकत नाही कारण त्याचे कौटुंबिक वाद आहेत असे देखील बोलले जाते पण तसे नसून रिपोर्टनुसार, सैफ अली खानची जेवढी संपत्ती आहे ती भारत सरकारच्या ऐनिमि डिस्प्यूट एक्ट अंतर्गत येते. आणी
ऐनिमि डिस्प्यूट एक्ट अंतर्गत येणाऱ्या संपत्तीवर कोणीही उत्तराधिकारी होण्याचा हक्क गाजवू शकत नाही. हा कायदा 1968 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान मंजूर करण्यात आला होता, ज्यामध्ये 2016 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. या कायद्यामुळेच सैफ अली खान संपत्तीची वाटणी आपल्या मुलांमध्ये करू शकत नाही.
सध्या सैफ यांच्या संपत्तीवर Custodian of the Enemy property for India अंतर्गत भारत सरकारचा अधिकार आहे. एवढंच नसून त्या संपत्तीचा मालकी हक्क देखील सैफ अली खान याच्या नावे हस्तांतरीत केला जाऊ शकत नाही. पण जर कोणाला हक्क हवा असेल तर तो कायद्याची मदत घेवू शकतो.
सध्या ट्रेंडिंग 👉