Sai Tamhankar : सई ताम्हणकर ने दिली तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, म्हणाली, नवीन अध्यायाला सुरुवात करत असताना.…
Sai Tamhankar : मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक बोल्ड आणि स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या सई ताम्हणकरने तिच्या चाहत्यांना नुकतीच एक आनंदाची बातमी दिली आहे. ती आनंदाची बातमी काय याची तुम्हालाही उत्सुकता वाटत असेल ना?
सांगलीची सई ताम्हणकर हिने मुंबईत स्वतःचं पहिलं घर खरेदी करून ती तिच्या मुंबईच्या नव्या घरी राहायला सुद्धा गेली, तिने सोशल मीडियावर नुकताच एक सामान शिफ्ट करतानाचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे.
सई ताम्हणकरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ‘अकरावं ठिकाण… पुन्हा घाबरून आणि उत्साहानं, मी माझ्या नवीन घरात पाऊल ठेवतेय, एक स्वप्न पूर्ण झालं. माझं पहिलं मुंबईतलं घर, एक मैलाचा दगड गाठला, घरी बोलावण्याचं ठिकाण, जिथे आठवणी विणल्या जातील. पण आनंदादरम्यान, एक कडू आठवण. एकेकाळी जे माझं घर होतं त्याला मी निरोप देताना, परिचित भिंती आणि जुन्या निवासस्थानाचा निरोप घेतेय, ज्या ठिकाणी मी एकेकाळी आरामात राहिले होते ते सोडते आहे.♥️
सध्या ट्रेंडिंग 👉