Prajakta Mali on Marriage : प्राजक्ता माळी बोलली लग्नाबद्दल! मी लग्न.
Prajakta Mali on Marriage : प्राजक्ता माळी हीने काही कालावधीतच आपली अशी एक खास ओळख बनवली आहे. तिने आजवर खूप टीव्ही सीलरिअल्स, जाहिराती आणी काही वेब सिरीज व चित्रपटामध्ये सुद्धा भूमिका केल्या आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचे लाखो चाहते आहेत. प्राजक्ताचे चाहते तिच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन असतात. ती सोशल मीडिया साईट्स वर नेहमी सक्रिय असून ती त्याचे फोटोज आणी व्हिडिओज टाकत असते. नुकतेच तिने कर्जत मध्ये एक फार्म हाऊस सुद्धा विकत घेतले आहे.
प्राजक्ता माळी ही सध्या तिच्या ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याच्या प्रमोशनमध्ये ती सध्या व्यस्त आहे. यावेळी एका मुलाखतीत तिला तिच्या खरं प्रेम आणी लग्नाबद्दल विचारण्यात आले यावर उत्तर देताना प्राजक्ता म्हणाली कि ”वाट बघा’. प्रेमात आहेच मी, स्वत:च्या आयुष्याच्या… मला असं वाटतं की प्रत्येकानंच असलं पाहिजे. कोणाच्या दुसऱ्याच्या प्रेमात का पडायचं? तुम्ही स्वत:च्या आयुष्याच्याही प्रेमात असू शकता, जे की मी पूर्णपणे आहे. मी सतत अशी हसत असते ते या प्रेमामुळेच शक्य आहे.”
आणी लग्नाबद्दल ती म्हणाली कि
“बेडीत अडकणं, कुठेतरी बंधनात अडकून राहणं हे माझ्या स्वभावात नाही. हे माझ्या स्वभावाच्या विरोधात आहे, कदाचित होणारही नाही. काही सांगता येत नाही.”
कळत नकळत तिने आपण लवकर लग्न करणार नाही असा संदेश दिलाय जणू.
प्राजक्ता ही सोनी मराठी या चॅनेल वर ‘हास्यजत्रा’ या मराठी विनोदी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत असते. तिचे कार्यक्रमातील लूक व सुंदरता हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. प्राजक्ता ने नुकताच एक बिझनेस सुद्धा सुरु केला असून तिचं एक दागिन्यांचं ब्रँड असून ती प्राजक्ताराज असं त्या ब्रँडचं नाव.
सध्या ट्रेंडिंग 👉 Uorfi javed : उर्फी जावेद चे झाले या सुपरहिट बाॅलिवूड अभिनेत्याशी लग्न, कळाली का ही बातमी!.