आदिपुरुष आता OTT वर पाहू शकणार, कोणत्या प्लॅटफॉर्मवर कधी दिसणार?
Adipurush OTT Release – ओम राऊद दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटाचे worldwide closing झाले. तसेच आदिपुरुष कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कोणत्या तारखेला रिलीज होणार आहे तेदेखील जाहीर झाले.
प्रभासचे आगामी बहुचार्चित चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘सलार’ आता लवकरच प्रदर्शित होणार आहेत. प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून ला प्रदर्शित झाला होता पण चित्रपटाचे प्रदर्शन म्हणावे तेवढे सफल ठरले नाही.
‘आदिपुरुष’ रिलीज होण्याआधी सिनेमाची जी हाईप होती ती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर थिएटर बाहेर पाहायला मिळाली नाही. पहिल्या शो नंतरच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला, ओपनिंग नंतर चित्रपट चांगली कमाई करू शकला नाही.
‘आदिपुरुष’ चित्रपट प्रभासच्या ‘बाहुबली’ व ‘साहो’ यासारखी चांगली कमाई करू शकला नाही. आदिपुरुष आता लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 1 ऑगस्ट रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. तसेच 28 सप्टेंबरला प्रभासचा ‘सालार’ चित्रपट रिलीज होणार आहे.