RBI NBFC News: बजाज फायनान्स, एलआयसी हाउसिंग, श्रीराम फायनान्स यांच आता काय होणार; आरबीआयने जारी केले नवे नियम.
भारतातील सर्वात श्रीमंत व सर्वात मोठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी सांगितले की, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, एलआयसी हाउसिंग फायनान्सआणि टाटा सन्स सारख्या एकूण 15 मोठ्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) अतिरिक्त नियामक शासनाच्या अधीन करण्यात आले असून मध्यवर्ती बँकेने बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचे विविध स्तरांमध्ये वर्गीकरण केले आहे. याचा फायदा कायदा व व्यवस्थापन नियंत्रित करण्यासाठी होईल.
आरबीआयने बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचे विविध स्तरांमध्ये वर्गीकरण केले आहे ते या प्रकारे, या श्रेणी म्हणजे बेस टियर (NBFC-BL), मिड टियर (NBFC-ML), अप्पर टियर (NBFC-UL) आणि टॉप टियर (NBFC-TL). आरबीआयकडून टॉप 15 बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
टॉप 15 वित्तीय कंपन्या
बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, मुथूट फायनान्स, आदित्य बिर्ला फायनान्स, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, टाटा सन्स, एल अँड टी फायनान्स, पिरामल फायनान्स, कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस, पीएनबी हाउसिंग फायनान्स, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, या कंपन्याना पहिल्या 15 बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांची यादीत स्थान प्राप्त करण्यात यश संपादन झाले.
कशी केली निवड?
वरील निवड ही RBI च्या द्वारे मालमत्तेच्या आकारमानानुसार आणी स्कोअरिंग पद्धतीनुसार (NBFC-UL ) पात्रता जाणून करण्यात आली व आणखी एक खास बातमी म्हणजे TMF बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेड जी पूर्वी टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेड या नावाने ओळखली जायची हिची निवड झाली नाही कारण सध्या ही कंपनी तिची पुनर्रचनाकरण्यात व्यस्त आहे.
पण कशासाठी?
गेल्या 2 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये RBI ने स्केल-बेस्ड रेग्युलेशन (SBR) च्या संदर्भात NBFC साठी सुधारित नियामक व्यवस्था जारी केली होती. या अंतर्गत, एकदा नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीचे NBFC-UL म्हणून वर्गीकरण झाल्यानंतर, ती वर्धित नियामक आवश्यकतांच्या अधीन असेल. म्हणजे तिला RBI चें नियम आणी अटी या आक्षेपर्ह मानाव्या लागतील व हे त्याच्या वर्गीकरणाच्या तारखेपासून किमान पाच वर्षांच्या कालावधीसाठी असेल. थोडक्यात RBI यांवार अप्रत्यक्ष रित्या शासन करेल असे म्हण्यात काही हरकत नाही.
हेही वाचा 👉 बँक ऑफ महाराष्ट्र ची ग्राहकांसाठी मालामाल योजना, तब्बल इतक मिळेल व्याज, वाचा नाहीतर नंतर कराल पश्चाताप.
याचा फायदा ग्राहकांना होणार असून या वित्तीय संस्था कडून कोणताही छुपा कर, किंवा अटी किंवा कोणत्या ही प्रकारची फसवणूक होणार नाही याची खात्री RBI ने घेतली आहे.
आजचे ट्रेंडिंग 👉