UIDAI NEWS: आधार कार्डधारकांची बल्ले बल्ले; सरकार घेऊन येतंय ही गोष्ट पूर्ण पणे मोफत.
आजच्या सर्व काही ऑनलाईन होत चाललेल्या जगात बँकिंग, मनी ट्रान्सफर, त्याच बरोबर 7/12 उतारा शेती विषयी, व्यापारा विषयी किंवा मेडिकल क्षेत्र असो व शैक्षणिक कोणता ही फॉर्म भरणे apply करणे, किंवा बँकेच्या kyc (know your customer ) साठी असो जवळपास सर्वच कामांसाठी आधार कार्ड ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, हिच्या शिवाय कोणतंही ऑनलाईन काम होणे शक्य नाही. पण ते बरोबर व अपडेट असणं हे ही तितकंच महत्वाचं.
तुम्ही जर 10 वर्षे जुने आधार कार्ड वापरत असाल तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण आता अशी सुविधा सरकार घेऊन आलाय , ज्याद्वारे तुम्ही कोणतेही पैसे खर्च न करता आधार कार्ड अपडेट करू शकता. आधार कार्ड बनवणारी संस्था UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढवली आहे, जिथे तुम्ही हे काम सहज व पूर्ण पणे मोफत करू शकता.
जर तुम्ही लवकरात लवकर आधार कार्डशी संबंधित अपडेटचे हे काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागेल, म्हणजेच तुमची सर्व महत्त्वाची कागदोपत्री कामे मध्येच अडकू शकतात . जर तुमच्याकडे 10 वर्षे जुने आधार कार्ड असेल, तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
या तारखेपर्यंत तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करा
आता आधार कार्ड बनवणाऱ्या UIDAI कंपनी कडून आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख 14 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या तारखेपर्यंत तुम्ही तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता.
आधार कार्ड अपडेट करण्याची सेवा १५ मार्च २०२३ पासून सुरू आहे. 15 मार्चपूर्वी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 25 रुपये शुल्क भरावे लागायचे पण आता ही सुविधा मोफत आहे.
कुठे करावे आधार कार्ड अपडेट
तुमचे 10 वर्ष जुने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in/ या लिंक वर क्लिक करावे लागेल. व त्या त्या ठिकाणी योग्य माहिती भरून किंवा अपलोड करून सबमिट करावी लागेल, याच्या मदतीने तुम्ही सर्व माहिती सहज अपडेट करू शकता, यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.