Post office monthly income scheme | पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना : शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, जागा, जमिनी किंवा सोने हे आजकाल गुंतवणूकिचे पर्याय जास्त परतावा देण्याची हमी देत असले तरीही भारतातील भरपूर लोक हे सर्वात सुरक्षित व हमखास परतावा मिळवण्यासाठी बँका किंवा पोस्ट ऑफिस (Post office) मध्ये ठेवी ठेवण्यावर भर देतात. यामुळेच बँका, पोस्ट ऑफिस (Post office) हे नवनवीन योजना, स्कीम्स घेऊन येत असतात आज आपण पण अशाच एका स्कीम बद्दल बोलणार आहोत.
पोस्ट ऑफिस (Post office) ही अशी एक स्मॉल सेविंग गुंतवणूक स्कीम घेऊन आली आहे जिला आपण पोस्ट ऑफिस MIS स्कीम म्हणू शकतो (Post office monthly income scheme ) ज्यामध्ये तुम्हाला एकदाच गुंतवणूक करायची आहे व ती 5 वर्षांनी परिपक्व होते. यात तुम्ही धोका न पतकरता चांगली कमाई करू शकता. ही योजना आणखी चांगली व प्रबळ बनवण्यासाठी पोस्ट ऑफिस (Post office) ने तिच्या व्याजदर ही वाढवला आहे. 1 एप्रिल 2023 पासून हिचा व्याजदर 7.4% असून तिच्या कालावधी मध्ये ही वाढ करण्यात आली आहे. या योजनेत तुम्ही एकेरी खात्यामध्ये जास्तीत जास्त 5 लाख रुपये व संयुक्त खात्यामध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवू शकता.
ही Post office MIS (Post office monthly income scheme) योजना 5 वर्षांनी परिपक्व होत असून तुम्हाला इच्छा असल्यास ही आणखी 5 वर्षे वाढवता येते. व तुम्हाला मिळणारे व्याज हे जरी वार्षिक असले तरी ते दरमहा तुमच्या सेविंग खात्यावर टाकायची व्यवस्था पोस्ट ऑफिस ने केली आहे.
जर समजा तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 7.4% ने वर्षाला 36,996 इतके व्याज मिळेल व महिन्या च्या हिशोबाने तुम्हाला दरमहा 3083 रुपये मिळतील. ही योजना एकेरी खाते किंवा संयुक्त खाते अशी उघडता येते. संयुक्त खाते मध्ये 2 किंवा 3 व्यक्तींना हे खाते उघडता येते. व पोस्ट ऑफिस मध्ये एकेरी खात्याचे संयुक्त किंवा संयुक्त खात्याचे एकेरी सुद्धा बदलता येते त्यासाठी पोस्ट ऑफिस (Post office) ला किरकोळ अर्ज करायला लागतो.