Credit Card : क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी ही महत्त्वाची कागदपत्रे द्यावी लागतात; जाणून घ्या क्रेडिट कार्डचे फायदे आणि तोटे.
आजकालच्या ऑनलाईन जमान्यात ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर किंवा ऑनलाईन शॉपिंग ही खूप सामान्य व जरुरी गोष्ट बनली आहे. पण हे सर्व करता करता आपल्या खात्यावरचा बॅलन्स कधी तळाला येतो हे कळतच नाही. मग यात नोकरदारांसाठी एक सुविधा असते कि त्यांचा पगार ते त्या भरोस्यावर खर्च करत असतात. मग यावर आणखी एक जबरदस्त उपाय म्हणजे क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड हे आपण ज्या प्रमाणे ऑनलाईन वापरू शकतो त्याच प्रमाणे ऑफलाईन सुद्धा atm सारखे वापरू शकतो. कोणत ही अतिरिक्त व्याज न घेता 45 ते 50 दिवस तुम्हाला याचे परतफेड करण्याची मुभा देते.
ही महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवा (क्रेडिट कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे)
Credit card documents required : प्रत्येक कंपन्याचे क्रेडिट कार्डसाठी (Credit Card) अर्ज करताना लागणारी कागदपत्रे ही जवळपास सारखीच असतात (Credit Card important documents). ओळखीचा पुरावा म्हणजे तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र असू शकते. (bankbazaar) बँकबाजारच्या मते, पत्त्याच्या पुराव्यासाठी वीज बिल, टेलिफोन बिल, किंवा तुमच्या निवासी पत्त्याची इतर कायदेशीर कागदपत्रे आवश्यक असू शकतात.
याशिवाय वार्षिक इनकम टैक्स रिटर्न देखील तयार ठेवावे. तुमचा स्वतःचा व्यवसाय किंवा उत्पन्नाचे इतर स्रोत असल्यास, तुम्ही ते तुमच्या आर्थिक स्थितीचे प्रमाणपत्र म्हणून सादर करू शकता. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची नवीनतम सॅलरी स्लिप तयार ठेवा. याशिवाय तुम्हाला एक एप्लीकेशन फॉर्मभरून द्यावा लागेल, त्यात तुमची वैयक्तिक माहिती आणि क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी (Credit Card) अधिकृत विनंती असते.
क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये तुम्हाला ((Credit Card important documents)), नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो आणी मागील तीन ते सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट देण्यासही सांगितले जाऊ शकते. हे तुमच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यात मदत करतात. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कंपनीने जारी केलेला फॉर्म 16 तयार ठेवा. हा तुमच्या भरलेल्या करांचा आणि TDS कपातीचा पुरावा आहे.
क्रेडिट कार्डचे फायदे आणि तोटे
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर शिस्तबद्ध पद्धतीने केला तर क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी फायदेशीर आहे. पण जर तुम्ही आर्थिक शिस्तीत निष्काळजीपणा करत असाल. म्हणजेच थकबाकी वेळेवर भरण्यात तुम्ही निष्काळजी असाल तर ते क्रेडिट कार्ड वापरणे तुम्हाला महागात पडू शकते. कारण मुदतीनंतर विलंब झाल्यास बँका प्रचंड व्याज आणि दंड आकारतात.