SSY : महाराष्ट्रात फारसा हा प्रकार चालत नाही पण तरीही मुलींची जन्मताच हत्या किंवा मुली नको हा प्रकार अजूनही पाहावायस मिळतो याची खास कारणे म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा खर्च व त्यांच्या लग्नाचा खर्च त्यामुळे काही लोकांना त्या बोझ वाटतात कारण मुलींना लग्न झाल्यावर सासरी म्हणजेच दुसऱ्याच्या घरी जावे लागते. यावर नियंत्रण व गरजूना मदत म्हणून सरकार विविध योजना राबवत असते आज आपण त्यातील एका खास योजनेबद्दल जाणून घेऊया तीच नावं आहे सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana).
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana).
केंद्र सरकारने मुलींच्या शिक्षण तसेच लग्नाचा खर्च पुरवण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना (SSY) राबवली आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीचे खाते उघडू शकता. ही एक छोटी बचत योजना आहे ज्याचा व्याजदर दर 3 महिन्यांनी निश्चित होतो परंतु सध्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सुकन्या समृद्धी योजनेच्या (SSY) व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यावर, तुम्हाला वार्षिक जवळपास ८% दराने व्याज मिळते.
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याची योग्य वेळ
तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षांची होईपर्यंत कधीही सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) खाते उघडू शकता. जर एखाद्या पालकाने मुलीच्या जन्मानंतर लगेचच या योजनेत खाते उघडले तर तो 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर ते खाते मॅच्युअर होते ज्यातून तुम्ही 50% रक्कम काढू शकता व उर्वरित रक्कम मुलगी 21 वर्षांची झाल्यावर काढू शकता.
कसे मिळतील तुम्हाला ६४ लाख रुपये..
समजा तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडले आणि दरमहा 12,500 रुपये भरले तर 1 वर्षात 1.5 लाख रुपये जमा होतील. जर यावर 7.6% व्याज दराने मानला तरी तुम्हाला भरपूर पैसे मिळतील आणि या रकमेवर कोणताही कर नाही. तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तुम्ही एकाच वेळी संपूर्ण रक्कम काढल्यास, तुम्हाला मॅच्युरिटी तारखेला 63,79,224 रुपये मिळतील. यामध्ये तुमची गुंतवलेली रक्कम 22.50 लाख रुपये असेल आणि तुम्हाला त्यावर 41,29,634 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्ही 64 लाख रुपये कमवू शकता.
कर माफ योजना…
तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) दरवर्षी 1.5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला त्यावरही कर माफी मिळेल. ही योजना EEE दर्जासह येते, याचा अर्थ असा की तुम्हाला गुंतवलेली रक्कम, व्याजाची रक्कम आणि मॅच्युरिटी रकमेवरही कर भरावा लागणार नाही. या योजनेला आपण कारमुक्त (Tax free ) योजना असे ही म्हणू शकतो..