RBI News today : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ग्राहकांना मोठी खुशखबर, कर्जदारांसाठी खूप मोठा दिलासा. जाणून घ्या
आपण बँकाकडून, खाजगी कंपन्याकडून किंवा ऑनलाईन काही अँप्लिकेशन मधून लोन घेतो पण जेंव्हा आपण लोन घेतो तेंव्हा नियम व अटी जास्त खोलवर वाचत नाही व बँकाही काही नियम व अटी मुद्दाम ग्राहकांना सांगत नाहीत.
त्यातीलच एक प्रकार म्हणजे व्याजदर वाढला तर बँक लोन चा कालावधी परस्पर ग्राहकाला न विचारता वाढवते.
याच नियमाला विळखा घालत RBI ने सर्व बँका व वित्तीय संस्थांना हा आदेश दिलाय कि कर्जावरील बदलत्या किंवा स्थिर व्याजदरावर स्विच करण्याचा हक्क कर्जदारांचा असला पाहिजे.
RBI ने जाहीर केलेल्या परिपत्रकात असे नमूद केले आहे कि त्यांनी नवीन लोन घेणाऱ्याना त्यांचा कालावधी आणि व्याजदर याबाबत सखोल माहिती द्यावी तसेच बदलता किंवा स्थिर व्याजदर निवड हा निर्णय सुद्धा ग्राहकांना द्यायला हवा. RBI ने सर्व बँका व वित्तीय संस्थांना अंमलबजावणीसाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत अंतिम मुदत दिली आहे.
तसेच ग्राहकांना व कर्जदारांना त्यांच्या तक्रारी निवारण साठी एक योग्य प्लॅटफॉर्म उभारण्यात यावा हे ही सांगितले व भविष्यात जर व्याजदर किंवा कालावधी यात काही बदल करायची गरज पडल्यास कर्जदाराशी संवाद साधून भेट घेऊन त्यांची संमती व सही घेऊनच बदल होण्यात यावा.
RBI च्या या निर्णयाचा खुप फायदा लाखो कर्जदारणा होणार असून त्यांची होणारी पिळवणूक थांबन्यास मदत होणार आहे.
सध्या ट्रेंडिंग :👉