Post Office Scheme 2023 : पोस्ट ऑफिसची धमाकेदार बंपर योजना; पोस्ट ऑफिस कडून मिळणार 16 लाख रुपये, जाणून घ्या कसे.
Post office scheme 2023 in marathi :
आजकालच्या धावपळीच्या जीवनात सर्वजन काही ना काही काम करत आहेत, वाढती महागाई, उंचावत चाललेले राहणीमान यामध्ये पैसा हा खूप कमी पडत आहे त्यामध्ये मग तो भविष्यासाठी साठावणे हे त्याहूनही अवघड. आपण तरीसुद्धा काही ना काही बचत करत चालत असतो पण त्याचबरोबर बचतीबरोबर जर चांगलाच फायदा मिळाला तर उत्तमच. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत याबद्दल.
सध्या पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणूक करण्याच्या अनेक योजना आहेत, त्यात गुंतवणूक करून लोक श्रीमंत होत आहेत व पैसे कमवत आहेत.अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही गुंतवणूक करून श्रीमंत व्हायचे असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या लोकप्रिय योजनेत गुंतवणूक करू शकता. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका भन्नाट योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही छोटीशी गुंतवणूक करून मोठी रक्कम तयार करू शकता.
हेही वाचा 👉 बँक ऑफ महाराष्ट्र ची ग्राहकांसाठी मालामाल योजना, तब्बल इतक मिळेल व्याज, वाचा नाहीतर नंतर कराल पश्चाताप!.
ऑफिस मधील आरडी स्कीम :
ही आहे पोस्ट ऑफिस मधील आरडी स्कीम. तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असून तुम्ही आरडी स्कीममध्ये मासिक गुंतवणूक करू शकता. या योजनेला पोस्ट ऑफिस आरडी खाते असेही म्हणतात. तुम्ही 10 वर्षात जर मासिक 10 हजार रुपये म्हणजेच दररोज 333 रुपये गुंतवून एक मोठी रक्कम तयार करू शकता.
कोणाकोणाला मिळेल लाभ
यामध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये खाते उघडू शकते. यामध्ये संयुक्त खाते सुद्धा उघडता येते. तुम्ही हे खाते फक्त 100 रुपयांपासून सुरू करू शकता व या योजनेची 100% हमी सरकार देते. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. तुम्ही त्यात कितीही पैसे गुंतवू शकता.
मॅचूरिटी कालावधी
पोस्ट ऑफिसचे आरडी खाते उघडल्यानंतर 5 वर्षांनी किंवा 60 महिन्यानंतर ते परिपक्व होते. तुम्ही हे आरडी खाते आणखी 10 वर्षांसाठी वाढवू शकता. तुम्ही RD खाते 3 वर्षांनंतर बंद करू शकता तसेच आणखी एक विशिष्ट्य गोष्ट खाते उघडल्यानंतर 1 वर्षानंतर 50% पर्यंत कर्ज घेऊ शकता. समजा काही कारणास्तव तुम्ही पैसे भरायला असमर्थ असाल तर पोस्ट ऑफिस आरडी खाते पैसे जमा न करता 5 वर्षे उघडे राहू शकते.
तर कसे मिळतील 16 लाख?
तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये 10 वर्षांसाठी मासिक 10,000 किंवा दरदिवसा 333 रुपये गुंतवल्यास, तुम्हाला 10 वर्षांनंतर 5.8 टक्के दराने व्याज मिळेल, त्यानंतर तुम्हाला 16 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. तुम्ही 10 वर्षात एकूण 12 लाख रुपये गुंतवता ज्यामध्ये तुम्हाला 4.26 लाख रुपये व्याज मिळतात. त्यानुसार, तुम्हाला मॅच्युरिटीवर 16.26 लाख रुपये मिळतील.
लोक सध्या हे वाचतायत 👉