पीएनबीने (PNB) म्हटले आहे की दोन वर्षांपासून ज्या चालू आणि बचत खात्यांमधून व्यवहार केले गेलेले नाहीत, ती खाती निष्क्रिय मानली जातील. अशा खातेदारांना खाते सक्रिय करण्यासाठी पुन्हा केवायसी करावी लागेल.
देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB ) ग्राहकांसाठी एक अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत, बँकेने असे म्हटले आहे की अशी बचत खाती आणि चालू खाती ज्यामध्ये गेल्या दोन वर्षांत कोणताही व्यवहार झाला नाही, ती निष्क्रिय मानली जातील. व ही निष्क्रिय खाती पुन्हा सक्रिय करण्यासाठी पुन्हा केवायसी करावी लागेल, कदाचित तुम्हाला शाखेला भेट द्यावी लागेल.
पंजाब नॅशनल बँकेने X वरून सांगितले
पंजाब नॅशनल बँकेने (PNB ) आपल्या ग्रहकांना सांगितले आहे की, एसएमएस आणि डेबिट शुल्क, किंवा तुमच्या खात्यावर बँकेने दिलेले व्याज, किंवा तुमच्या खात्यावरून बँकेने वजा केलेली कोणती राशी ही व्यवहार म्हणून मानली जाणार नाही. जिथे तुम्ही स्वतः काही पैसे जमा केले, किंवा काढले,किंवा कुणाला तरी पाठवले, किंवा एटीएम वरून काढले हा व्यवहार मानला जाईल
निष्क्रिय खात्यांसाठी RBI चे म्हणणे
पीएनबी बँकेने सांगितले की हा नियम आरबीआयच्या आदेशानुसारच लागू करण्यात आला आहे. म्हणजेच निष्क्रिय खात्यांबद्दल आरबीआयचे सुद्धा हेच म्हणणे आहे की दोन वर्षात जर व्यवहार झाला नाही तर ते निष्क्रिय मानले जाईल व ते पुन्हा सुरू करण्यासाठी पुन्हा केवायसी करावी लागेल.
खाते निष्क्रिय असताना बँका माहिती देतात
एका वर्षापेक्षा जास्त काळ एखाद्या खात्यातून कोणताही व्यवहार न झाल्यास, बँका ग्राहकाला त्याबद्दल माहिती देत असतात आणि त्याला खात्यातून कोणतेही डेबिट किंवा क्रेडिट व्यवहार करण्याचे आवाहन करत असतात. त्याचवेळी, बँकेने एखादे खाते दोन वर्षांच्या व्यवहारांमुळे निष्क्रिय मानले, तर त्याला तीन महिने अगोदर ही माहिती ग्राहकांना द्यावी लागेल. बँक हे काम वेळोवेळी करतच असतात.