pm किसान योजना 15 व्या हप्त्याची तारीख
PM Kisan Yojana: अलीकडेच मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी 2,000 रुपयांचा 14 वा हप्ता रिलीज केला होता.
अलीकडेच मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी 2,000 रुपयांचा 14 वा हप्ता रिलीज केला होता. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते. त्यातच कागदपत्रांच्या अपातरत्यामुळे काहीना हफ्त्याचे पैसे मिळू शकले न्हवते. तर आता सर्वाना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील 15 व्या हप्त्यासाठी पैसे कधी मिळणार आहेत हा प्रश्न पडला आहे.
पीएम किसान योजना पुढील हप्ता
PM किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता कधी मिळाला होता ते जाणून घ्या
PM किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्याचे 2,000 रुपये 27 जुलै 2023 रोजी जारी करण्यात आले होते. या हप्त्यात एकूण 8.5 कोटी शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले. एका सरकारी अहवालानुसार सुमारे 12 कोटी लोकांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला.
सुमारे साडेतीन कोटी शेतकरी हप्त्याच्या रकमेपासून वंचित राहिले. यामध्ये अनेक शेतकरी होते, ज्यांनी ई-केवायसीचे काम केले नव्हते. पडताळणी न झालेल्या शेतकऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी होती, त्यानंतर सरकारने दणका दिला. तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर महत्त्वाचे काम यावेळी पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल.
पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
केंद्र सरकारद्वारे चालवली जाणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दरवर्षी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये देण्याचे काम केले जाते, दर 4 महिन्याला हे पैसे दिले जातात. आता पर्यंत एकूण 14 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना 28,000 रुपये दिले गेले आहेत.
pm किसान 15 वा हप्ता पी एम किसान योजना 15वा हप्ता या तारखेला होईल बँक खात्यात जमा PM Kisan 15th Installment Date:
पीएम-किसान हेल्पलाइन नंबर 155261/011-24300606