पाकिस्तान ने शोधला व्हाट्सअँप ला पर्याय तर त्याचे नाव आहे बीप पाकिस्तान. कॉलिंग चॅटिंग विडिओ कॉल आणि भरपूर फिचर्स सह चला पाहूया
What Is Beep Pakistan: | बीप पाकिस्तान म्हणजे काय:
आहे तरी काय beep pakistan? तर बीप पाकिस्तान हे एक पाकिस्तानी अँप्लिकेशन असून ते व्हाट्सअँप ला टक्कर देईल असा काही देशप्रेमी पाकिस्तानी लोकांचा अंदाज आहे. याची निर्मिती पाकिस्तान च्या IT मंत्रालयाने राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान मंडळाच्या मदतीने केली आहे अशी बातमी आहे. यात ही ग्राहकांना ऑडिओ विडिओ कॉलिंग सह रिअल टाइम मेसी्जिंग चा अनुभव आहे.
पाकिस्तानचे आयटी मंत्री अमिनुल हक यांनी याच आठवड्यात बीप पाकिस्तान सादर केला आहे. पाकिस्तानला व्हॉट्सअप चा पर्याय उपलब्ध आहे, हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो, असे म्हणाले. ते म्हणले की हे ऍप त्याचा डेटा फक्त पाकिस्तान मधीलच सर्वर वर स्टोर करेल आणि सौर्स कोड पण फक्त पाकिस्तान मधेच असेल ज्याला फक्त राष्ट्रीय आयटी बोर्ड नियंत्रित करेल ह्या मुळे याला खूप सुरक्षित म्हण्यात येत आहे.
बीप पाकिस्तान कधी लॉन्च होणार आणि काय खास आहे?
हे ऍप सध्या सर्व नागरिकांसाठी ओपन केलेले नसून सध्या ते फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे.पाकिस्तानच्या आयटी आणि दळणवळण मंत्रालय आणि NITB यांच्यातील अंतर्गत संवादासाठी तसेच निरीक्षण पाहणी साठी याचा वापर केला जात आहे. पुढील टप्प्यात इतर मंत्रालये आणि विभागांनाही हे ऍप वापरता येणार आहे. तिसर्या टप्प्यात हे ऍप पाकिस्तानच्या सर्वसामान्यांसाठी प्रसिद्ध केले जाईल अशी माहिती आहे.
Beep pakistan हे ऍप यावर्षी अखेर पर्यंत लाँच होईल असे पाकिस्तानचे आयटी मंत्री अमिनुल हक यांनी एका मुलाखतीत सांगितले. या ऍप मध्ये यूजर्सना व्हॉट्सअप प्रमाणेच ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा मिळते. हे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, दस्तऐवज शेअरिंग आणि इन्स्टंट रिअल टाइम मेसेजिंग यांसारख्या सेवांसह येईल. हा प्रकल्प 2020 मध्ये सुरू झाला. या ऍप च्या एपीके फाइल्सही उपलब्ध असल्या तरी, एपीके फाइल्स सुरक्षित नाहीत हे ध्यानी धरून ते सामान्य नागरिकांना खुले झाल्यावरच त्याचा वापर सामान्य नागरिकांनी करावा ही विनंती.
धन्यवाद.