Ola s1x electric scooter details (ola s1x इलेक्ट्रिक स्कूटर तपशील)
इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक नवीन S1X नावाची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर S1X किमतीबाबत वाहन बाजारात उत्सुकता आहे, तर ही ओला इलेक्ट्रिक स्कूटर S1X १५ ऑगस्टला लॉन्च होणार असल्याचे समजले आहे. तसेच ओलाच्या सीईओनी 15 ऑगस्ट रोजी ग्राहक दिन साजरा करण्याबद्दल देखील बोलले आहे. ओलाने काही काळापूर्वी इलेक्ट्रिक स्कूटर S1 Air लाँच केली होती.
ओला त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटर पोर्टफोलिओमध्ये आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर जोडणार आहे. ओला 15 ऑगस्ट रोजी आपल्या स्कूटर श्रेणीमध्ये S1X मॉडेल लॉन्च करण्याच्या योजनेवर काम करत आहे. Ola ने S1X बद्दल कोणतेही तपशील शेअर केले नसले तरी ती सुमारे 100 किमीची रेंज ऑफर करते असे म्हटले जाते.
Ola s1x electric scooter specifications (ola s1x इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये)
S1 एअर इलेक्ट्रिक स्कूटर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. नुकतेच लाँच झालेली S1 Air अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिझाइनसह खूपच आकर्षक आहे. या गाडीला 3 kWh बॅटरी क्षमता आणि 90 किमी/ताशी उच्च गती आहे.
Ola s1x electric scooter price (ola s1x इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत)
OLA S1X इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीबद्दल असे म्हटले जात आहे की ती 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केले जाईल. यामध्ये तुम्हाला नवीन फीचर्स पाहायला मिळतील. ओलाकडे सध्या त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर पोर्टफोलिओमध्ये S1 Pro, S1 आणि S1 Air स्कूटर आहेत. आता त्यात S1X हे नवीन नाव जोडण्याचे संकेत मिळाले आहेत.
हेही वाचा : ही आहे जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आता भारतात लॉन्च; किंमत बघून कुणाचा विश्वासच बसणार नाही.