Amazon One Payment वापरून आता फक्त हात दाखवून होणार पेमेंट! होय! UPI ची सुद्धा गरज नसेल.
Amazon One हा आपला हात दाखवून पेमेंट करण्याचा एक नावीन्यपूर्ण मार्ग आहे!
Amazon One Payment : आता अॅमेझॉन कॅशलेस पेमेंट्सला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युपीआय याच्याही पुढे घेऊन जातं आहे. अॅमेझॉन लवकरच एक नवीन पेमेंट टेकनॉलॉजि लाँच करत आहे. त्यामध्ये उजर्सना पेमेंट करण्यासाठी कार्ड, गूगल पे, फोन पे अशा अॅप्सची गरज पडणार नाही.
तुम्हाला अमेझॉनची Amazon Pay ही मोबाइल पेमेंट सेवा तर माहीतच असेल. त्यात गूगल पे, फोन पे, सारखे मोबाईल अॅप वरून पेमेंट करणे शक्य होते.
पण आता नुकतेच अॅमेझॉनने Amazon One ची घोषणा केली आहे. Amazon One वापरून पेमेंट करण्यासाठी आता फक्त तुमचा हात वेव्ह करण्याची गरज आहे.म्हणजेच आता हात दाखवून पेमेंट करनेही शक्य होणार आहे.
सध्या Whole Foods स्टोरवर याची सुरुवात करण्यात आली आहे. तुम्ही जर Amazon prime मेंबर असाल तर Amazon One चा वापर केल्यास तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे.
अॅमेझॉनची ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला Amazon One वर रजिस्टर करावे लागणार आहे. एकदा साइन अप केल्यानंतर जिथे Amazon One उपलब्ध असेल तिथे तुम्ही ही सेवा वापरू शकणार आहे.
साइन अप करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचे Amazon खाते, तुमचा मोबाइल नंबर आणि क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आवश्यक असेल. एकदा तुम्ही तुमची Amazon One प्रोफाइल पूर्ण केल्यावर तुमच्या जवळपासचे Amazon One डिव्हाइस शोधा आणि तेथे फक्त तुमचा तळहाताचा निशाण तुमच्या प्रोफाइलला लिंक करा. त्यानंतर तुम्ही जेथे Amazon One ने पेमेंट स्वकारले जात असेल तिथे तुमचा हात स्वाईप करून पेमेंट करू शकता. Amazon One सर्व ग्राहकांना वापरण्यासाठी विनामूल्य असेल.