आता आधार कार्ड चा खेळ खल्लास! जन्म प्रमाणपत्रावरून होणार सर्व कामे.
Birth Certificate : आपल्याला हल्ली कोणत्याही कामासाठी ढीगभर कागदपत्रे किंवा ओळखपत्रे घेऊन फिरावी लागतात जसे आधार कार्ड, पॅन कार्ड मतदान ओळखपत्र कार्ड इत्यादी. यावरच तोडगा म्हणून किंवा उपाय म्हणून सरकार काही पाहुले उचलत आहे. त्यासाठी जन्म प्रमाणपत्राचा वापर करण्याचा ठराव मंजूर झाला आहे, असे झाल्याने भारतातील नागरिकांच्या जन्म आणि मृत्यूची अधिक अचूक आणि योग्य माहिती मिळेल, असा सरकारचा अंदाज आहे. तसेच लोकांना विविध सरकारी सेवा मिळणेही आता सोपे होईल असे सांगण्यात येत आहे.
वापर कुठे कुठे?
1 ऑक्टोबरपासून जन्म प्रमाणपत्र हे खूप महत्वाचे व उपयोगाचे कागदपत्र होणार आहे. आता तुमच्याकडे फक्त बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच जन्माचे प्रमाणपत्र असेल तर अनेक कामे यातून होतील, नवीन नियमानुसार, जन्म प्रमाणपत्राचा वापर शाळा प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, विवाह नोंदणी, सरकारी नोकरी, पासपोर्ट आणि आधारसह अनेक ठिकाणी एकच कागदपत्र म्हणून होईल.
याशिवाय लोकांना विविध सरकारी सेवा मिळणेही सोपे होणार आहे. जन्म प्रमाणपत्राची प्रक्रियाही सरकार पूर्वीपेक्षा सोपी करत आहे, जेणेकरून लोकांना ते मिळवण्यात कोणतीही अडचण येऊ नये. जसे आता आधार कार्ड ऑनलाईन आले असून त्याला पॅनकार्ड, मोबाईल नंबर असे सर्व लिंक करावे लागत आहे तसेच जन्म प्रमाणपत्र हे सुद्धा डिजिटल स्वरूपात येणार आहे.
केंद्र सरकारने या पावसाळी अधिवेशनात जन्म-मृत्यू नोंदणीचे विधेयक आणले होते. कायदा झाल्यानंतर तो 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. यानंतर लोक विविध सेवांसाठी एकच दस्तऐवज म्हणून वापरण्यास सक्षम असतील. याचा वापर करून शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापासून ते सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यापर्यंत सर्व काही करता येईल. व जनतेचा त्रास किंवा व्याप कमी होईल असे सांगीतलें जात आहे.
केंव्हा लागू होणार?
रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 1 ऑक्टोबर पासून जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा, 2023 च्या कलम 1 च्या उप-कलम (2) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून,केंद्र सरकारने सांगितले की अधिनियमातील तरतुदी 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होतील.
डिजिटलिकरण –
जन्म-मृत्यूचे डिजिटल प्रमाणपत्र उपलब्ध
कायद्याच्या अंमलबजावणीनंतर सर्वात मोठा बदल म्हणजे जन्म-मृत्यू दाखलेही डिजिटल पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. सध्या फक्त त्याची हार्ड कॉपी उपलब्ध आहे. त्यासाठी अनेक दिवस कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागतात हे ऑनलाईन उपलब्ध करून देऊन त्याची 1 अधिकृत वेबसाईट बनवून किंवा एखादे अँप बनवून ते जनतेला समर्पित करण्यात येणार आहे
आधार कार्डप्रमाणेच असेल!
आतापर्यंत सर्वत्र ओळखपत्र म्हणून आधारचा वापर केला जात होता. आधार तुमच्या इतर दस्तऐवज आणि खात्यांशी लिंक करणे आवश्यक आहे. आता जन्म-मृत्यू प्रमाणपत्र सर्वत्र सर्वत्र स्वीकारले जाणारे ओळखपत्र म्हणून काम करेल व आधार च्या इतकेच महत्व त्याला ही प्राप्त होईल.
हेही वाचा 👉