8th Pay Commission Update: तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. सध्या सर्व कर्मचारी 8th Pay Commission ची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना लवकरच एक चांगली बातमी मिळू शकते.
नुकत्याच आलेल्या एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार लवकरच 7 व्या वेतन आयोगानंतर 8 वा वेतन आयोग लागू करू शकते. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
आंदोलन चालू आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 8 व्या वेतन आयोगाबाबत दिल्लीत कर्मचारी आणि पेन्शनधराकांचे आंदोलन सुरू आहे. 8 व्या वेतन आयोगाचा निर्णय झाला तर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात लक्षणीय वाढ होऊ शकते. मात्र याला सरकारकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 8वा वेतन आयोग येत्या वर्षात म्हणजेच 2024 मध्ये स्थापन केला जाणार आहे. साधारण दीड वर्षात याची अंमलबजावणी होणार आहे.
👉 Gold identify : दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या खरे आहेत की बनावट, हे आहेत ओळखण्याचे 4 मार्ग.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 8 वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षनीय वाढ होणार आहे. याशिवाय फिटमेंट फॅक्टरमध्येही बदल होऊ शकतो.
मूळ वेतन 44.44 टक्क्यांनी वाढू शकते
8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांची जणू लॉटरीच लागणार आहे. कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टरही अंदाजे ३.६८ पटीने वाढेल. अहवालानुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातही सुमारे ४४.४४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
👉 Cibil score : वारंवार तपासणीमुळे सिबिल स्कोअर कमी होतो, जाणून घ्या RBI चे नियम.