Cm shetkari yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार हा प्रश्न सर्वच शेतकऱ्यांना आहे. आज आपण तेच जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होईल.
देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. त्यामुळे आता सर्वत्र नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता केव्हा खात्यामध्ये जमा होईल अशी चर्चा सुरू झाली आहे.
राज्य सरकारने सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील सुमारे 87 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल असे सरकारने स्पष्ट केले आहे.
Namo Shetkari Yojana 1st Installment Date 2023
नमो शेतकरी योजनेबद्दलचा 28 जुलै रोजी जाहीर झालेल्या एका निर्णयानुसार राज्यातील नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वाटपासाठी कृषी आयुक्तांच्या नवे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये बचत खाते उघडण्यास मान्यता दिली गेली आहे. तसेच राज्यामध्ये ही योजना राबवण्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवर एक स्वतंत्रपणे आज्ञावली विकसित केली जाईल असे सांगण्यात आलं आहे.
Namo shetkari yojana 1st installment information
हेही वाचा : जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आता भारतात लॉन्च; किंमत बघून कुणाचा विश्वासच बसणार नाही.
नमो शेतकरी सन्माननिधी योजनेचा पहिला हप्ता कधी मिळेल याविषयी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की : राज्य सरकारने देखील नमो सन्मान शेतकरी योजना यावर्षी महाराष्ट्रात सुरू केलेली आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर पर्यंत तो कार्यक्रम सुरू होईल. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे 6 आणि राज्य सरकारचे 6 असे एकूण 12 हजार रुपये मिळतील असे ते म्हणाले.
नमो शेतकरी सन्माननिधी योजनेसाठीचा संपूर्ण निधी मंजूर झाला असून ही योजना लवकरात लवकर राबवण्यात येईल आणी पुढील महिनाभरात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आता लवकरच पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपये ऐवजी 12000 रुपये मिळतील.