Gold identify: दिवाळीचा सण ऐन तोंडावर आला आहे दिवाळीच्या काळात सणासुदीला दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. सोने हा एक सर्वांच्या आवडीचा मौल्यवान धातू आहे. पण सोन्याचे दागिने खरेदी करण्यापूर्वी सोने 100% खरे आहे की बनावट ते ओळखने अतिशय महत्वाचे आहे म्हणजे आपली फसवणूक होणार नाही.
Marathimadhun News : सोने खरे आहे की बनावट हे ओळखन्यातील मोठी अडचण असते ती त्याची शुद्धता कशी तपासायची. अनेकदा सोनाराचे ऐकूनच आपण सोने खरेदी करतो. तुम्ही त्या सोनाराकडून अनेक वर्षे सोने आणि इतर दागिने खरेदी करत असल्यामुळे तुम्ही त्याच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवता. पण तुम्ही घरी आल्यानंतर सोन्याची शुद्धताही तपासू शकता. कसे जाणून घ्या..
हे देखील वाचा 👉
आजचा सोन्याचा दर तपासा 👉 Gold Price News : दिवसाच्या शेवटच्या क्षणी सोन्याचे भाव कोसळले,10 ग्रॅमचा दर ऐकून व्हाल आश्चर्यचकित.
मोबाईल वरून एका मिनिटात चेक करा 👉 Check Purity Of Gold : तुमचे सोने किती शुद्ध आहे ते आता तुमच्या मोबाईलवरून तपासा, एका मिनिटात समजेल सोन्याची शुद्धता.
नवीन नियम 👉 कायदेशीररीत्या घरात किती सोने ठेवता येते, जाणून घ्या काय आहेत इन्कम टॅक्सचे नियम.
हे करून बघा 👉 दिवाळी दिवशी पाल कशी करते मालामाल? दिवाळी दिवशी पाल दिसली तर काय करावे, जाणून घ्या.
अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता सोने खरे आहे को बनावट :
हॉलमार्क
हॉलमार्क तपासणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. दागिन्यांच्या मागील बाजूस हॉलमार्क तुम्हाला दिसेल. जर हा हॉलमार्क तेथे नसेल तर तुम्ही ते सोने ताबडतोब बदलून घ्या. हॉलमार्कचा आधार भारतीय मानक ब्युरोने दिलेले प्रमाणपत्र आहे.
मॅग्नेट टेस्ट
जर तुम्हाला वाटत असेल की हॉलमार्क बनावट आहे, तर तुम्ही मॅग्नेट टेस्ट करून त्याची चाचणी करू शकता. सोन्याचे स्वरूप असे आहे की ते चुंबकाला प्रतिसाद देत नाही. त्याच वेळी, जवळजवळ इतर सर्व धातूंमध्ये चुंबकीय गुणधर्म असतात आणि ते चुंबकांद्वारे खेचले जातात. जर तुमचे सोने चुंबकाला चिकटले किंवा थोडे जरी खेचले गेले तर ते शुद्ध नाही असे समजावे
Gold Price Today 👉 10 ग्रॅम सोने 54,000 रुपयांना खरेदी करा, थेट 7000 रुपयांची बचत!.
फ्लोट टेस्ट
सोने पाण्यावर तरंगत नाही. हे त्याच्या संरचनेमुळे घडते. सोन्याचे रेणू एकमेकांना चिकटून राहतात त्यामुळे त्याची घनता वाढते आणि ते पाण्यावर तरंगू शकत नाही. त्याच वेळी, त्यात इतर कोणताही धातू मिसळला तर तो तरंगू लागतो. लक्षात ठेवा की इतर अनेक धातू आहेत जे पाण्यावर तरंगू शकतात. ते सोन्यात मिसळले तर नक्कीच सोने तरंगते.
ऍसिड टेस्ट
घरी सोन्याची शुद्धता तपासण्याचा हा सर्वात विश्वासार्ह मार्ग मानला जातो. यासाठी नक्कीच थोडे पैसे खर्च होतात, परंतु जर तुम्ही सोने खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करत असाल आणि तुम्हाला त्याची शुद्धता सुनिश्चित करायची असेल तर तुम्ही हे नक्कीच करू शकता. यासाठी तुम्हाला हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिडचे एक किट घ्यावे लागेल. ज्वेलरच्या दगडासारखा एक दगड घ्यावा लागेल. यानंतर तुम्ही धातूवर दगड घासून त्यावर आम्लाचे द्रावण टाका. सोन्याशिवाय इतर कोणताही धातू त्यात विरघळतो. भारतात साधारणपणे 14k ते 18k पर्यंतचे सोने दागिने बनवण्यासाठी शुद्ध मानले जाते.